'जर बिल मिळालं नाही तर तुमचं जेवण फुकट’. रेल्वेची कॅटरिंग सेवा पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांचा निर्णय
Indian Railway (Photo Credit: Twitter)

दिवसेंदिवस भारतीय रेल्वेचा (Indian Railway) प्रवास अधिक आरामदायी आणि वेगवान करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता सरकार रेल्वे प्रवासादरम्यान कॅटरिंग सेवा अधिक पारदर्शक करणार आहे. नुकत्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एका बैठकीमध्ये त्यांनी कॅटरिंग सेवा पारदर्शक करण्यासाठी येत्या मार्च महिन्यापासून प्रवासात जर जेवणाचं बिल मिळालं नाही तर जेवण फुकट (No tips please, if no bill, your meal is free')असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वेतील कॅटरिंग सेवा सुधारण्यास आता मदत होणार आहे.

पियुष गोयल यांचे महत्त्वपूर्ण निर्णय -

प्रवासात जेवणाचं बिल नाही तर प्रवास फुकट या सेवेसोबतच प्रवाशांना जेवणाची तक्रार नोंदवण्यासाठी आता एकाच हेल्पलाईन क्रमांक सुरु होणार आहे. मार्च महिन्यापासून प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी पदार्थाच्या दराचे बोर्ड लावावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच या बोर्डवर ‘कृपया टीप देऊ नका, जर बिल मिळालं नाही तर तुमचं जेवण फुकट असणार आहे’. हा संदेशही लिहलेला असेल यामुळे प्रवासात केटरर्सकडून होणारी लूट थांबवण्यास मदत होणार आहे. स्वाईप मशीनदेखील रेल्वेत कर्मचाऱयांकडे उपलब्ध करून दिले जाईल यामुळे बिलाची रक्कम समजण्यास आणि व्यवहार सुलभ होण्यास मदत होईल.

केटरिंग सेवेप्रमाणेच रेल्वे स्थानकांवर वाय फाय सेवा वाढवण्याकडे रेल्वेचा भर आहे. सध्या 723 रेल्वे स्थानकांवर वाय-फायची सुविधा उपलब्ध आहे लवकरच सुमारे 2000 स्थानकांवर वाय फाय सेवा उपलब्ध होणार आहे.