बिहार विधानसभेत (Bihar assembly) दारुबंदीच्या (Liquor Ban in Bihar) मुद्द्यावरुन चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा (Vijay Kumar Sinha) यांनी सारण ( Saran District) जिल्ह्यात बनावट दारुमुळे झालेल्या मृत्यंच्या पार्श्वभूमीवर सरकारला प्रश्न विचारला. या वेळी उत्तर देताना मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) विरोधी पक्षावर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना नितीश कुमार चांगलेच भडकले. नितीश कुमार यांच्या विधानसभेतील भाषणाचा एक व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओत नितीश कुमार विरोधकांना उद्देशून '.. क्या हो गया, .. अरे क्या हो गया?.. अरे तुम ये बोल रहे हो!' असे विचारताना दिसतात.
बिहारमधील सरना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितनुसार, बनावट दारु प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर काही लोक अत्यावस्थ आहेत. त्यांच्यावर सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. या सर्वांनी मंगळवारी (13 डिसेंबर) रात्री उशिरा मारहौरा उपविभागातील मसरख परिसरात विषबाधा झालेले मद्य प्राशन केले होते. (हेही वाचा, Aditya Thackeray: शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी घेतली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांसह उपमुख्यमंत्री तेजस्वी यांची भेट)
डोयला गावात 15 हून अधिक लोकांनी देशी दारू प्राशन केल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी सायंकाळी केला होता. काही तासांनंतर मद्यपींना लट्या होऊ लागल्या. त्यांना मळमळ, डोकेदुखी आणि अस्वस्थतेची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.
व्हिडिओ
#WATCH | Bihar CM Nitish Kumar loses his temper in State Assembly as LoP Vijay Kumar Sinha questions the state govt's liquor ban in wake of deaths that happened due to spurious liquor in Chapra. pic.twitter.com/QE4MklfDC6
— ANI (@ANI) December 14, 2022
दरम्यान, विषारी दारु प्यायल्याने झालेल्या मृत्यूच्या याच घटनेचे पडसाद बिहार विधानसभेत उमटले. विरोधात असलेल्या भाजपने विधानसभेत जोरदार गदारोळ केला. राज्यातील दारुबंदी सपशेल खोटी ठरल्याचा आरोपही भाजपने सभागृहात केला. त्यानंत नितीश कुमारकाहीसे संतापले. त्यांनी विरोधी पक्षनेता नितीश कुमार यांना उद्देशून म्हटले की, “अरे, तुम बोल रहे हो…!