Who is Nidhi Tewari: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी त्यांचे खासगी सचिव (Private Secretary) म्हणून भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी निधी तिवारी (Nidhi Tewari) यांची नियुक्ती केली आहे. सरकारने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, निधी तिवारी यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) मान्यता दिली आहे आणि त्या तात्काळ त्यांच्या जबाबदाऱ्या स्वीकारतील. केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) 29 मार्च रोजी निधी तिवारी यांच्या नियुक्तीची माहिती देणारा आदेश जारी केला. आदेशानुसार, त्यांना पंतप्रधानांच्या खाजगी सचिव पदाची जबाबदारी तात्काळ देण्यात आली आहे.
निधी तिवारी बनल्या पंतप्रधान मोदींच्या नवीन खाजगी सचिव -
Nidhi Tewari appointed as Private Secretary to Prime Minister Narendra Modi. pic.twitter.com/erpTlJfjfn
— Press Trust of India (@PTI_News) March 31, 2025
निधी तिवारी या भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी पंतप्रधान कार्यालयात (PMO) उपसचिव म्हणून काम केले आहे. त्या नोव्हेंबर 2022 पासून या पदावर कार्यरत होत्या. यापूर्वी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागात अवर सचिव म्हणून काम केले.
खाजगी सचिव पदाचे महत्त्व -
पंतप्रधानांचे वैयक्तिक सचिव हे पद खूप महत्त्वाचे आहे. हा अधिकारी केवळ पंतप्रधानांच्या अधिकृत फायली आणि बैठका व्यवस्थापित करत नाही तर धोरणनिर्मिती आणि प्रशासनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या कामांमध्येही सहभागी असतो. (Earthquake In Myanmar-Thailand: म्यानमार-थायलंडमध्ये भूंकप! पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांना दिला मदतीचा हात)
निधी तिवारी या एक अनुभवी आणि सक्षम अधिकारी आहेत. ज्यांनी आधीच पीएमओमध्ये काम केले आहे. त्यांची कार्यशैली आणि परराष्ट्र व्यवहारातील अनुभव लक्षात घेता, त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.