New Year 2020 SONG: केंद्रातील एनडीए प्रणीत भाजप सरकारच्या कामगिरीवर बणवले गाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आले पसंत

जगभरात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. भारतासह अवघे जग 2019 या वर्षाला निरोप देत 2020 या नव्या वर्षाचे स्वागत करण्यास सज्ज आहे. या निमित्ताने गेल्या वर्षभरातील विविध क्षेत्रांत घडलेल्या घडामोडींचा आढावा घेतला जात आहे. केंद्र सरकारलाही या वर्षात काही गोष्टींमध्ये यश मिळाले तर काही गोष्टींमध्ये टीका स्वीकारावी लागली. त्यामुळे 2019 मध्ये केंद्र सरकारच्या (Modi Government) कामगिरीवर प्रकाश टाकणारे एक गाणे तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गाण्याचा व्हिडिओ स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि त्यांच्या चाहत्यांनाही आवडला आहे.

NaMo 2.0 ट्विटर हँडलने ट्विट करुन या गाण्याची व्हिडिओ लिंक शेअर केली आहे. सोबत लिहिले आहे, '2011 हे वर्ष भारतासाठी एक अद्भूत पर्ष होते. आम्ही त्या गोष्टी बदलण्याचा विचार केला जे आम्हाला वाटत होते की हे कधीच बदलू शकत नाहीत. आम्ही गोष्टी आम्ही साध्य करु याबाबत आम्ही कधी विचारही केला नव्हता. अपेक्षीत आहे की, आपणही हे पसंत कराल.'  (हेही वाचा, Happy New Year 2020 Wishes: नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश, ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून खास करा नव्या वर्षाचा पहिला दिवस!)

पीएम मोदी

व्हिडिओ

NaMo 2.0 ट्विटर हँडलचे हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रीट्विट करत लिहिले आहे की, 'अत्यंत सुंदर संपादन. 2019 मध्ये आम्ही खूप प्रगती केली. अपेक्षा आहे की, 2020 पर्यंत भारत बदलण्याचा आणि 130 कोटी भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न कायम राहतील.'