RG Kar Medical College Case: वैद्यकीय व्यावसायिकांवर होणाऱ्या वाढत्या हिंसाचाराचा सामना करणे हा या नियमाचा उद्देश आहे. मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवरील हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये त्वरीत कारवाई करण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालक (DGHS) अतुल गोयल यांनी स्वाक्षरी केलेल्या निर्देशात, हिंसाचाराच्या कोणत्याही घटनेनंतर रुग्णालयाच्या प्रमुखांनी जास्तीत जास्त सहा तासांच्या आत संस्थात्मक प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करणे आवश्यक आहे.
रुग्णालयांमध्ये वाढता हिंसाचार
एएनआय या वृत्तसंस्थेने X प्लॅटफॉर्मवर सामायिक केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवर होणारी हिंसा ही आता सामान्य घटना झाली आहे. विविध रुग्णालयांमध्ये अनेकदा डॉक्टर आणि वैदकीय व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांवर हल्ले, हिसा झाल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, सरकारी निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे की, आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना अनेकदा शारीरिक हिंसा, धमक्या आणि शाब्दिक गैरवर्तनाचा सामना करावा लागतो. प्रामुख्याने रूग्ण किंवा त्यांच्या सेवकांकडून. कोलकात्याच्या आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर बुधवारी रात्री झालेल्या आंदोलनादरम्यान जमावाने हल्ला केल्याचा आरोप झाल्यानंतर हे निर्देश जारी करण्यात आले. 9 ऑगस्ट रोजी हॉस्पिटलच्या सेमिनार रूममध्ये 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या कथित बलात्कार आणि हत्येला प्रतिसाद म्हणून हे निषेध करण्यात आले. (हेही वाचा, HC On RG Kar Medical College Vandalism: 'रुग्णांना हलवा आणि रुग्णालय बंद करा', आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयाच्या तोडफोडीच्या घटनेवरून कोलकाता उच्च न्यायालयाने ममता सरकारवर ताशेरे)
आर जी कर घटनेवर राष्ट्रीय पातळवर निषेध
कनिष्ठ डॉक्टरांच्या दुःखद मृत्यूमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली असून वैद्यकीय समुदायामध्ये निषेध व्यक्त होत आहे. एम्स मंगलगिरी येथील वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. श्रीजा यांनी आर जी कर (RG Kar Medical College) येथील आंदोलक डॉक्टरांबाबत आदर व्यक्त केला. जमावाचा हल्ला आणि पोलिसांच्या निष्क्रियतेचा निषेध केला. त्यांनी या घटेनची चौकशी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) कडून पारदर्शक तपास करण्याची आणि पीडित कुटुंबाला पुरेशी भरपाई देण्याची मागणी केली. (हेही वाचा, Kolkata Doctor Rape-Murder Case: आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची तोडफोट, 19 जणांना अटक; कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण)
एक्स पोस्ट
In the event of any violence against any healthcare worker while on duty, the Head of Institution shall be responsible for filing an Institutional FIR within a maximum of 6 hours of the incident: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/2YGDZVRx8O
— ANI (@ANI) August 16, 2024
आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. डॉ. श्रीजा यांनी हा हल्ला केवळ डॉक्टरांवरील गुन्हा नसून महिला आणि मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, मंत्रालयाच्या निवेदनाने आरोग्यसेवा व्यावसायिकांचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे, जे बऱ्याचदा उच्च-तणावपूर्ण वातावरणात काम करतात आणि हिंसेला अधिकाधिक असुरक्षित असतात.