पुढील वर्षी, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) चा सामना करण्यासाठी 26 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. नुकतीच बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची दुसऱ्या दिवसाची बैठक संपली. या बैठकीमध्ये विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव निश्चित करण्यात आले आहे. ही आघाडी INDIA (Indian National Democratic Inclusive Alliance) म्हणून ओळखली जाईल. मराठीमध्ये याचा अर्थ 'भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी' असा आहे. बेंगळुरूच्या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब झाले.
'INDIA’ हे नाव राहुल गांधींनी सुचवले होते, असा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी ट्विट केले की, ‘राहुल गांधी यांनीच हे नाव सुचवले होते. त्यांच्या सर्जनशीलतेचे खूप कौतुक झाले.’
बंगळुरू येथे सुरू असणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत,या आघाडीचं नाव INDIA ठेवण्याचा प्रस्ताव @RahulGandhi यांनी मांडला.त्यांच्या या कल्पकतेच प्रचंड कौतुक.सर्व पक्षांनी याला अनुमोदन देत आगामी लोकसभा निवडणूक INDIA या नावाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
I - Indian
N -…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 18, 2023
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी जाहीर केले की, 26 पक्षांनी एकजुटीने काम करण्याची शपथ घेतली आहे. विरोधी पक्षांचा हेतू स्वत:साठी सत्ता मिळवण्याचा नसून देशातील लोकशाहीचे रक्षण करण्याचा आहे. ते पुढे म्हणाले की, मला आनंद आहे की बेंगळुरूमध्ये 26 पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत. आज आम्ही 11 राज्यांमध्ये एकत्र सरकार आहोत. एकट्या भाजपला 303 जागा मिळाल्या नाहीत तर ते मित्रपक्षांच्या मतांचा वापर करून ते सत्तेवर आले आहेत.
विपक्षी एकता का नया नाम "INDIA"
I - Indian
N - National
D - Developmental
I - Inclusive
A - Alliance#JDU #NitishKumar#MahaGathbandhan#UnitedWeStand#oppositionmeeting #bengaluru pic.twitter.com/ttsk7g0aVN
— Janata Dal (United) (@Jduonline) July 18, 2023
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका ट्विटमध्ये नमूद केले आहे की, भाजप अध्यक्ष आणि त्यांचे नेते त्यांच्या जुन्या मित्रपक्षांशी जुळवून घेण्यासाठी राज्या-राज्यात धाव घेत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याबद्दल भाजपवर निशाणा साधत खर्गे म्हणाले की, प्रत्येक संस्था विरोधकांच्या विरोधात शस्त्र बनवली जात आहे. ते पुढे म्हणाले की, या बैठकीचा आमचा हेतू स्वत:साठी सत्ता मिळवण्याचा नाही. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. भारताला पुन्हा प्रगतीच्या, कल्याणाच्या आणि खऱ्या लोकशाहीच्या मार्गावर नेण्याचा संकल्प करूया. मंगळवारी कर्नाटकातील बेंगळुरू येथे 26 विरोधी पक्षांच्या 50 नेत्यांच्या दुसऱ्या बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले. (हेही वाचा: Maharashtra CM Eknath Shinde दिल्लीत पोहचले NDAच्या बैठकीला; 2024 मध्ये रेकॉर्डब्रेक विजयाचा व्यक्त केला विश्वास)
या बैठकीला खरगे यांच्याशिवाय सोनिया गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, शरद पवार, अरविंद केजरीवाल, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, उद्धव ठाकरे, फारुख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला आणि इतर अनेक नेते उपस्थित होते. बंगळुरूपूर्वी 23 जून रोजी बिहारची राजधानी पटना येथे विरोधी पक्षांची पहिली बैठक झाली.