Earthquake | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नेपाळमधील बांगलुंग (Baglung District) जिल्ह्यात बुधवारी पहाटे एकापाठोपाठ एक असे दोन भूकंप (Nepal Earthquake) झाले. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची 4.7 आणि 5.3 इतक्या तीव्रतेची नोंद झाली. नेपाळच्या भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्र (NEMRC) ने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही भूकंप बुधवारी (28 नोव्हेंबर) सकाळी झाले.

नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्र (ational Earthquake Monitoring & Research Center Nepal) ने दिलेल्या माहितीनुसार, बांगलुंग परिसरात स्थानिक वेळेनुसार पहाटे 01:23 वाजता 4.7 तीव्रतेचा पहिला भूकंप झाला. NEMRC, नेपाळ यांनी केलेल्या ट्विटनुसार बागलुंग जिल्ह्यातील खुंगा येथे 02:07 वाजता (स्थानिक वेळेनुसार) रिश्टर स्केलवर 5.3 तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला.

ट्विट

दरम्यान, भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. वित्तहानी झाल्याबाबत अद्याप तपशील जाहीर झाला नाही.