NCW| Photo Credits: Twitter / ANI

केंद्रीय महिला आयोग (NCW)कडून काही मुलींना मॉडेलिंगमध्ये करियरचे आमिष दाखवत लैंगिक छळ आणि ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याच्या आरोपाखाली एक व्यक्ती आणि त्याच्या कंपनीवर गुन्हा दाखल आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये काही बॉलिवूड हस्तींचादेखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वी त्याची नोटिस बजावण्यात आली होती. परंतू आता पुन्हा महेश भट, उर्वशी रौतेला सह बॉलिवूडच्या इतर काही कलाकारांना महिला आयोगाकडून नवी नोटिस जारी करण्यात आली आहे.

आज (6 ऑगस्ट) दिवशी या प्रकरणाची व्हर्च्युअल हिअरिंग आयोजित करण्यात आली होती. People Against Rape in India (PARI) या संस्थेच्या संस्थापिका योगिता भायना यांनी तक्रार नोंदवली असून त्यांनी या प्रकरणामध्ये सिनेदिग्दर्शक महेश भट, अभिनेत्री उर्वशी रौतेला, मौनी रॉय, रणविजय सिंह, प्रिंस नरूला , इशा गुप्ता या कलाकारांचेही नाव घेतले आहे.

ANI Tweet

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रीय महिला आयोग (NCW)कडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये चंदीगड मध्ये आईएमजी वेंचर्स (IMG Ventures)नावाच्या एका कंपनीचे प्रमोटर सनी वर्मा यांच्याविरूद्ध आरोप करण्यात आले आहेत. त्यामध्ये मॉडेलिंग करियर मध्ये संधी देण्याचं आमिष दाखवत अनेक मुलींना ब्लॅकमेल करण्यात आलं आहे तसेच त्यांचा लैंगिक छळ देखील झाला आहे. 2,950 रूपये एंट्री फी आकारत 'मिस आशिया' स्पर्धेमध्ये त्यांना सहभागी करण्यात आलं आहे. दरम्यान यामध्ये यशस्वी ठरणार्‍या मॉडेल होतील. यामध्येच सनी वर्मा सोबत न्यूड फोटो शूट देखील करण्याची जबरदस्ती झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच शारिरीक संबंध ठेवण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता असे देखील आरोप आहेत.