Sharad Pawar (Photo Credit - Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार गुरुवारी सायंकाळी साधारण 8.30 वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. विरोधी पक्षांची एकजूट वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी समविचारी विरोधी पक्ष एकत्र येत असल्याच्या चर्चेदरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी खर्गे आणि गांधी यांची भेट घेतल्याच्या एक दिवसानंतर पवार आणि खर्गे यांची ही बैठक होणार आहे. (हेही वाचा: Eknath Shinde यांनी अटकेच्या भीतीपोटी गद्दारी केल्याच्या आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटाला Sanjay Raut यांनीही दिला दुजोरा; पहा काय म्हणाले)