शरद पवार यांचा ममता बॅनर्जी यांना CAB, NRC विरोधी भूमिकेला पाठिंबा
Sharad Pawar (Photo Credits: Getty)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकशाही वाचवा या असं आवाहन करत देशातील विरोधकांना 'नागरिकत्व कायद्या'विरूद्ध एकजुट होण्याचं आवाहन केलं होतं. याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एका पत्रकाद्वारा Citizenship Amendment Act आणि National Register of Citizens या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध दर्शवला आहे. ममता बॅनर्जींच्या नरेंद्र मोदी सरकार विरोधी भूमिकेला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांना पत्र लिहिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरूवात झाली होती.दरम्यान नागरिकत्व कायद्यावरून देशभरात आंदोलनं सुरू झाली आहे. अनेक राज्यांमध्ये CAA ला विरोध दर्शवला आहे. त्यासाठी ममता बॅनर्जी देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसल्या आहेत. CAA ला शरद पवार यांचा विरोध; एल्गार परिषदेच्या कारवाईची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी.  

शरद पवार यांचे पत्र

काही दिवसांपूर्वी झारखंड विधानसभा निवडणूकीतही भाजपा पक्षाचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता हळूहळू देशात भाजपा विरोधी गट तयार होत आहे. त्याचा फायदा घेत नगरिकत्व कायद्याला विरोध केल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी  शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नागरिकत्त्व कायद्यावरून आंदोलन करताना नागरिकांनी समाजात धार्मिक संघर्ष होणार नाही याची काळजी घ्यावी असं म्हटलं आहे. शांतता, संयमाने विरोध करण्याचं म्हटलं आहे. तर 8 राज्यांनी कॅबच्या अंमलबजावणीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करण्याचं म्हटलं होतं.