Haryana CM Oath Taking Ceremony: हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Assembly Elections 2024) मिळालेल्या घवघवीत विजयानंतर भाजपने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू केली आहे. 17 ऑक्टोबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. राज्यपाल बंडारू दत्तात्रेय नवीन सरकारच्या मंत्र्यांना पदाची शपथ देतील. गुरुवारी सकाळी 10 वाजता परेड ग्राउंड, सेक्टर 5, पंचकुला येथे शपथविधी सोहळा होणार आहे. भाजप नेते नायब सिंग सैनी (Nayab Singh Saini) सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नायब सिंह सैनी 17 ऑक्टोबर रोजी पंचकुलाच्या सेक्टर-5 येथील परेड ग्राऊंडवर सकाळी 10 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. केंद्रीय मंत्री आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले की, आम्हाला पंतप्रधानांची मंजुरी मिळाली आहे असून मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद 17 ऑक्टोबर रोजी पंचकुलामध्ये शपथ घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत. (हेही वाचा - Vinesh Phogat Wins in Haryana Assembly Election 2024: कुस्तीपटू विनेश फोगाट चं राजकीय आखाड्यात 'बाजी'; Julana मधून विजयी)
लवकरच होणार भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक -
दरम्यान, भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक अद्याप झालेली नाही. लवकरच नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार असून त्यात विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होणार असल्याचे मानले जात आहे. नायबसिंग सैनी यांची औपचारिकपणे नेतेपदी निवड होणार असल्याचे मानले जात आहे. भाजपने आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान म्हटले होते की, जर पक्ष पुन्हा सत्तेत आला तर नायबसिंग सैनी राज्याचे मुख्यमंत्री होतील. यापूर्वी अलीकडेच नायब सिंग सैनी यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.
विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळाला 48 जागा -
8 ऑक्टोबर रोजी भाजपने सर्व एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे सिद्ध केले आणि पक्षाने याहूनही मोठ्या बहुमताने सलग तिसऱ्यांदा हरियाणात सत्तेत परत येऊन इतिहास रचला. भाजपने विधानसभा निवडणुकीत 48 जागा जिंकल्या. जेजेपी आणि आयएनएलडीला फक्त दोन जागा जिंकता आल्या. तर काँग्रेसला 37 जागांवर समाधान मानावे लागले.