Navneet Rana, Ravi Rana | (Photo Credits: Facebook)

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण केल्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अमरावतीच्या आयुक्त आरती सिंह (Aarti Singh) यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. उदयपूरच्या धर्तीवर अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या आयुक्तांच्या अपयशामुळे झाल्याचे त्यांनी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पत्र लिहून म्हटले आहे. अमरावती येथे एका केमिस्टची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की केमिस्ट उमेशने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्टवर टिप्पणी केली होती. यातूनच उमेशचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. उमेश कोल्हे यांची 22 जून रोजी हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 22 जून रोजी झालेल्या या खून प्रकरणात आतापर्यंत एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

दुसरीकडे केमिस्टच्या हत्येप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी इरफान खानचा शोध सुरू असल्याचे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले आहे. इरफान एक एनजीओही चालवतो. राजस्थानमधील उदयपूर येथे शिंपी कन्हैया लालच्या हत्येच्या एक आठवडा आधी ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. (हे देखील वाचा: Maharashtra Murder Case: अमरावतीत उदयपूरसारखी घटना, मेडिकल मालकाची गळा चिरून हत्या; NIA कडून तपास सुरू)

अमरावती शहर कोतवाली पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, उमेश अमरावती शहरात औषधाचे दुकान चालवायचा. त्याने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक पोस्ट शेअर केली होती. उमेशने ही पोस्ट चुकून एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवली होती ज्यामध्ये इतर समुदायाचे सदस्यही होते.