कमलानाथ यांना 'डाकू' म्हणणे मुख्यध्यापकाला पडले महागात, शाळेतून निलंबित केले
कमलनाथ (Photo Credits: IANS)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांना एका शासकीय शाळेतील मुख्यध्यापकाने 'डाकू'ची उपमा दिली.यामुळे कमलनाथ यांना डाकू म्हणणाऱ्या मुख्यध्यापकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी मुख्याध्यापकाची शासकीय शाळेतील नोकरी गमवावी लागली आहे.

जबलपुर येथील एका शासकीय शाळेतील मुख्याध्यापकाचा सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ प्रचंड वायरल झाला होता. ज्यामध्ये या मुख्यध्यापकाने कमलनाथ यांची तुलना चक्क डाकूशी केली होती. या व्हिडिओमुळे स्थानिकच्या लोकांमध्ये खूप वाद झाले. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या मुख्याध्यापकालविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यामुळे मुख्यध्यापकाला डाकू म्हणणे खूप महागात पडले असून चांगली नोकरी गमवावी लागली आहे.

सोशल मीडियावर वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शिवराज सिंह आपले असून कमलनाथ डाकू असल्याच्या घोषणा केल्या जात होत्या. यामुळे जबलपुर येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकाविरोधात संपात व्यक्त करत पोलिसात तक्रार केली. तर मुख्यमंत्र्याच्या बाबतीत अशा पद्धतीचे बोलणे वाईट असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी केली गेली.