नाशिकमध्ये काल (29 जानेवारी) मालेगावहून कळवनकडे जाणारी बस आणि रिक्षामध्ये झालेला अपघात थरकाप उडवणारा होता. सुमारे 60 फूट खोल विहिरीत कोसळलेल्या दोन्ही वाहनांमधील 26 जण ठार झाले आहेत तर 32 जण जखमी आहेत. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय गृहमंत्री आमित शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच जखमींवर उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळावेत यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. Nashik Accident: रिक्षा-बस विहीरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 26 ठार, 32 जखमी; बचावकार्य संपलं.
विहीरीत बस आणि रिक्षा कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. बसची मागील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर 5 क्रेनच्या मदतीने विहिरीतून बस बाहेर काढण्यात रात्री उशिरा अग्निशमन दलाला यश आलं आहे. आज सकाळी या अपघातासाठी प्रशासनाने बचावकार्य थांबवल्याची माहिती दिली आहे.
अमित शहा यांचं ट्वीट
Deeply anguished by the tragic road accident in Nashik, Maharashtra.
My thoughts and condolences are with the bereaved families who lost their loved ones. I pray for the speedy recovery of those injured.
— Amit Shah (@AmitShah) January 29, 2020
रामनाथ कोविंद यांचं ट्वीट
महाराष्ट्रातील नाशिकमध्ये झालेल्या अपघाताची घटना ऐकून दुःख झाले. अपघातात प्राण गमवलेल्याच्या कुटुंबियांप्रती संवेदना प्रकट करतो व जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्ह्याव्यात अशा कामना व्यक्त करतो — राष्ट्रपती कोविन्द
— President of India (@rashtrapatibhvn) January 29, 2020
नाशिकच्या अपघातामध्ये जे प्रवासी व कर्मचारी ठार झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना महामंडळातर्फे दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तसेच जे प्रवासी जखमी आहेत त्यांच्यावर होणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च एसटी महामंडळातर्फे करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री, संसदीय कार्य तथा अध्यक्ष एसटी महामंडळ डॉ. अनिल परब यांनी दिली आहे.