File image of Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: IANS)

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Election 2019) च्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता देशभरात सार्‍याच पक्षांनी कामाला सुरूवात केली आहे. देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. सारेच पक्ष कामाला लागले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या नेत्यांना ट्विटरच्या माध्यमातून आवाहन केलं आहे. यामध्ये राहुल गांधींपासून (Rahul Gandhi)  ममता बॅनर्जी(Mamata Banerjee)  आणि अखिलेश यादव यांचा समावेश आहे. राजकारण्यांच्या सोबतीने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातील अनेक मान्यवरांना टॅग करून आवाहन केलं आहे.

नरेंद्र मोदींचं खास ट्विट

राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि एम के स्टॅलिन यांनी येत्या लोकसभा निवडणूकीमध्ये मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी प्रोत्साहन करावं या आशयाचं ट्विट केलं आहे. लोकशाही मजबूतीसाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन करण्यात आले आहे.

आज नरेंद्र मोदींनी एका खास ब्लॉगच्या माध्यमातून लोकांना निवडणूकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे.