Bus Accident प्रतिकात्मक प्रतिमा | फोटो सौजन्य - File Image

Nagpur-Bound Bus Overturns In Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात (Jabalpur District) रविवारी पहाटे नागपूरला जाणारी एक खाजगी बस उलटून (Bus Overturns) झालेल्या अपघातात (Accident) किमान तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बर्गी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रमणपूर घाटी परिसरात पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

नागपूरला जात होती अपघातग्रस्त बस -

प्राप्त माहितीनुसार, बस उत्तर प्रदेशातील अयोध्याहून महाराष्ट्रातील नागपूरला जात असताना हा अपघात झाला. एका पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की चालकाला गाडी चालवताना झोप लागली असावी. (हेही वाचा -Nagpur Accident: नागपूरमध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत 4 ठार, 20 जण जखमी)

दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये हैदराबाद येथील मलम्मा (45) आणि नागपूर येथील शुभम मेश्राम (28) आणि अमोल खोडे (42) यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी लखनादोन शहर आणि जबलपूर शहरातील रुग्णालयात नेण्यात आले. (हेही वाचा - Raichur School Bus Accident: रायचूरमध्ये सरकारी बसची शाळेच्या बसला धडक; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जण जखमी)

मध्य प्रदेशातील बोट उलटल्याने तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू -

तथापि, गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील माटाटिला धरणात बोट उलटली होती. या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मंगळवारी संध्याकाळी खानियाधना पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माटाटिला धरणातील एका बेटावर असलेल्या मंदिराकडे 15 जणांना घेऊन जाणारी बोट उलटली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.