NABARD Application 2021: नाबार्ड मध्ये 162 असिस्टंट मॅनेजर आणि मॅनेजर पदांसाठी नोकर भरती
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

NABARD Application 2021:  नाबार्ड मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. तर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) ने रुरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्विसेस, राजभाषा सर्विसेस, प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी सर्विसेसह डेव्हलेपमेंट बँकिंग सर्विसेसमध्ये असिस्टंट मॅनेजर आणि मॅनेजर पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. बँकेद्वारे 15 जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या नोटीसनुसार, ग्रेड ए आणि ग्रेड बी ऑफिसर पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

नाबार्ड असिस्टंट मॅनेजर आणि मॅनेजर भरती 2021 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nabard.org येथे उपलब्ध असलेल्यया ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करु शकता. अर्ज प्रक्रिया येत्या 7 ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे. त्याचसोबत उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, अर्जामध्ये काही बदल करायचा असेल तर तो अंतिम तारखेपूर्वी करावा. अर्जाचा शुल्क सुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे.(7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी! सरकारने Basic Pay वाढवण्यासंदर्भात दिली 'ही' महत्वाची माहिती)

-असिस्टेंट मॅनेजर (रूरल डेवेलपमेंट बैंकिंग सर्विसेस) – 148 पद

-असिस्टेंट मॅनेजर (राजभाषा सर्विसेस) – 5 पद

-असिस्टेंट मॅनेजर (प्रोटोकॉल एवं सिक्यूरिटी सर्विसेस) – 2 पद

-मॅनेजर (डेवेलमेंटल बैंकिंग सर्विसेस) – 7 पद

या नोकर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा युनिव्हर्सिटीमधून कमीतकमी 50 टक्के गुणांसह बॅचलर डिग्री किंवा 55 टक्के गुणांसह पीजी डिग्री उत्तीर्ण असावे. तर उमेदवारांचे वय 21 वर्षापेक्षा कमी आणि 30 पेक्षा अधिक नसावे. तसेच उमेदवारांना नाबार्ड कडून आयोजित करण्यात येणारी परिक्षा आणि इंटरव्यूला सामोरे जावे लागणार आहे. या संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.