मुंबई शेअर बाजारमध्ये पडझड कायम; सेन्सेक्स, निफ्टी कोसळली तर रूपया 74.89  वर
Sensex (Photo credits: PTI)

कोरोना व्हायरसची दहशत त्यापाठोपाठ टेलिकॉम कंपन्यांनी NGR संबंधित थकीत रक्कम भरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश याचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर पहायला मिळत आहे. दरम्यान आज अमेरिकन बाजारात झालेल्या पडझडीचे परिणाम आता भारतीय बाजारपेठांवरही पहायला मिळाले आहेत. आज (19मार्च) मुंबई शेअर बाजार लाल मार्क सहित उघडला. मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 1770.19 अंकांनी घसरून 27,139 वर उघडला तर निफ्टी 405.50 अंकांनी घसरून 8,063.30 वर पोहचला आहे. दरम्यान काल (18 मार्च) 3 वर्षांत पहिल्यांदाच सेंसेक्स 29 हजाराच्या खाली बंद झाला होता. दरम्यान एशियन बाजाराप्रमाणेच शांघाय, हॉंगकॉंग, सोल, जपान मधील व्यापारपेठांमध्येही निराशाजनक चित्र आहे.

येस बॅंकेचे शेअर आज पडले आहेत. दरम्यान काल इंडसइंड बॅंकेच्या शेअर्सचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. यामध्ये 23% घट पहायला मिळाली. तर अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत आता रूपयादेखील गडगडला आहे. रूपया  सध्या 74.89  वर पोहचला आहे.

ANI Tweet

मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 47 तर देशातही 170 च्या जवळ कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचल्याने आता भीती वाढत आहे. दरम्यान काल इटलीमध्ये एकाच दिवशी सर्वाधिक रूग्ण दगावले आहेत.