Jharkhand Mob Lynching: सोशल मीडीयाचे जसे फायदे आहेत तसेच अति आणि चूकीच्या वापरामुळे तोटेदेखील आहेत. टिक टॉक या अॅपचा वापरामुळे अनेकांनी आयुष्यात टोकाचे निर्णय घेतले आहेत. नुकताच झारखंडमध्ये तबरेज अंसारी (Tabrez Ansari ) च्या हत्येचा उल्लेख करत जर उद्या त्याच्या मुलाने बदला घेतला तर प्रत्येक मुसलमान दहशतवादी असतो असं म्हणू नका असं सांगत व्हिडिओ अपलोड केला होता. आणि अल्पावधीतच तो व्हायरल झाला. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 5 जणांवर कारवाई करत त्यांच्याविरूद्ध FIR दाखल केलं आहे. Tik Tok पुन्हा वादात, जामा मशिदीत डान्स व्हिडीओ बनवल्याने यापुढे केवळ प्रार्थनेसाठीच मिळणार प्रवेश
टीम 7 या ग्रुपमधील पाच जणांनी मिळून व्हिडिओ बनवला होता. शिवसेनेचे रमेश सोळंकी यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तक्रार दाखल केली. त्यानंतर सायबर सेलने 5 जणांच्या विरोधात 153 A अंतर्गत गुन्हा दाखल केला. टिक टॉक कडून त्यांचं अकाऊंटदेखील सस्पेंड करण्यात आलं आहे.
ANI Tweet
Mumbai Police cyber cell has registered an FIR against a group of people allegedly circulating a video on TikTok, related to mob lynching of Tabrez Ansari in Jharkhand. Matter is being investigated. TikTok has removed the video and suspended the accounts of the group of people. pic.twitter.com/YCs6xX8sJs
— ANI (@ANI) July 9, 2019
काय आहे प्रकरण?
झारखंडमध्ये तरबेजला सायकल चोरीच्या आरोपाखाली मारहाण करण्यात आली. त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. मारहाणीदरम्यान त्याला ' जय श्री राम' आणि 'जय हनुमान' असं म्हणण्यास भाग पाडलं होतं असाही आरोप करण्यात आला आहे.