Metro Aqua Line 3 | X

मुंबई मेट्रो 3 च्या (Mumbai Metro Line 3) दुसर्‍या टप्प्याचं आज 9 मे दिवशी अखेर लोकार्पण पार पडलं आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)  यांच्या हस्ते ही मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. पूर्वी आरे ते बीकेसी (BKC) पर्यंत  धावणारी मेट्रो आता आचार्य अत्रे चौक वरळी (Acharya Atre Chowk in Worli)  पर्यंत धावणार आहे. सध्याच्या भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या कार्यक्रमामध्ये हा लोकार्पणाचा कार्यक्रम झाला आहे. मात्र पुढील कफ परेड पर्यतच्या टप्प्यात आपण पीएम मोदी यांना बोलावून ही सेवा सुरू करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला आहे. उद्या 10 मे पासून नागरिक या मेट्रोने प्रवास करू शकणार आहेत. मेट्रो मुळे रस्त्यावरील वाहनांची कोंडी कमी होण्यास मदत होईल अशी सरकारला आशा आहे.

आज मुंबई मेट्रो 3 च्या दुसर्‍या टप्प्याच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मुंबई मेट्रोचा हा प्रोजेक्ट महत्त्वाकंक्षी आहे. अनेक अडथळांवर मात करून तो जनतेच्या सेवेत आला आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बीकेसी हे या मेट्रो प्रोजेक्ट मधील सर्वात मोठे स्टेशन आहे. तसेच अनेक स्टेशन वर मल्टिपल एंट्री गेट्स आहेत त्यामुळे गर्दीचं नियोजन होणार असल्याचा विश्वास देखील बोलून दाखवला आहे. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यांनी इंजिनियर्स आनि अन्य कर्मचार्‍यांसोबत मेट्रोचा प्रवास देखील केला आहे.

मेट्रोने मुंबई एअरपोर्ट गाठणंही शक्य

देवेंद्र फडणवीस यांनी सध्या मेट्रोचं काही प्रलंबित काम सुरू असल्याने शटल सेवा घेऊन एअरपोर्ट गाठावं लागत आहे असे म्हटलं आहे. पण भविष्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना मुंबई एअरपोर्टला मेट्रोने जाता येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा बराच वेळ वाचणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

प्रवासाचा वेळ आणि तिकीट

बीकेसी-वरळी विभागात आठ गाड्या आहेत ज्या 6 मिनिटे 20 सेकंदात पुढे जातात. एकेरी प्रवासासाठी अंदाजे 15 मिनिटे 20 सेकंदाचा वेळ लागत आहे. या प्रवासात तिकिटांची किंमत 10 ते 40 रूपयांपर्यंत आहे. 10 मे 2025 पासून मुंबई मेट्रो 3 चा दुसरा टप्पा नागरिकांसाठी खुला होत आहे.

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यापर्यंत मेट्रोची संपूर्ण सेवा प्रवाशांसाठी खुली करण्याचा प्रयत्न आहे. ही मेट्रो सेवा पुढे कफ परेड पर्यंत वाढवण्यात आली आहे.