Mumbai Goa Express Way: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद, लोटे चिरणी कळबस्ते मार्गाने वाहतूक वळवली
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

तुम्ही मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करत असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद केला असुन वाहतूक लोटे चिरणी कळबस्ते मार्गाने वळवण्यात आली आहे.दहा वर्षे होऊनही मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले नसल्याने दर वर्षी पावसाळ्यात या मार्गावरील प्रवाशांना वाहतूक कोडींला पुढे जाव लागतं.

परशुराम घाटील चौपदरीकरणाचे काम पुर्ण करण्यासाठी 25  एप्रिल 2022 ते 25  मे 2022, म्हणजेच एक महिन्यासाठी वाहतूक पुर्णत: बंद करण्यात आली होती. चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये व कामाला गती मिळावी आणि पावसाळ्यापूर्वी धोकादायक क्षेत्रातील काम पूर्ण व्हावे यासाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला होता. (हे ही वाचा:-Tina Dabi Ex Husband Athar Amir Khan : बहुचर्चीत IAS अधिकारी टीना डाबीचा पूर्व पती अतहर अमीर खान बोहल्यावर चढण्यास सज्ज)

पण आज तीन महिन्यांनंतरही घाटातील रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. प्रवाशांना परशुराम घाटातून प्रवास न करता लांबच्या मार्गाने म्हणजेच लोटे चिरणी कळबस्ते मार्गाने प्रवास करावा लागत आहे.  सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रवाशांना वाहतूक कोंडीला  समोर जावं लागत आहे. मुंबई-गोवा  महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.