मुंबई (Mumbai) मध्ये एका 40 वर्षीय पुरुषाला स्वतःच्याच 17 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केल्याच्या आरोपवारवरून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. हा इसम स्वतःच्याच मुलीवर तिच्या बॉयफ्रेंड सोबतचा सेक्स व्हिडीओ (Sex Video) व्हायरल करण्याची भीती दाखवून वारंवार अत्याचार करत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती, त्यांनतर पीडित मुलगी, तिचा 17 वर्षाचा बॉयफ्रेंड आणि मुलीची आई यांची चौकशी केल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला. धक्कादायक! नराधम पित्याचा पोटच्या मुलीवर 2 वर्षे बलात्कार; नकार दिल्यावर हत्या करून शरीराचे केले दोन तुकडे
मुंबई पोलिसांनी यामध्ये पुरुषावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. तर दुसरीकडे मुलीने आपल्या बॉयफ्रेंडवर देखील जबरदस्ती केल्याचा आरोप लावल्याने त्याला देखील अटक करण्यात आली होती मात्र अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार नेमका काय होता हे जाणून घेऊयात..
प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलीचे आपल्या कॉलेज मधील एका समवयीन मुलासोबत प्रेमसंबध होते, कॉलेजच्या प्रोजेक्ट्साठी एकदा हा मुलगा तिच्या पालकांच्या उपस्थितीत घरी आला होता, यावेळी त्याने सर्वांसाठी जेवण ऑर्डर केले पण मुलीने आपण कामात असल्याचे सांगत नंतर खाऊ असे सांगितले आणि जेव्हा ती खाण्यासाठी गेली तेव्हा जेवण संपले असल्याने ती चिडून स्वतःच्या खोलीत निघून गेली, तिला समजवण्यासाठी हा मुलगा देखील तिच्या खोलीत गेला. तिथेच या दोघांची शारीरिक जवळीक झाली. मात्र या सर्व प्रकाराचे मुलीच्या वडिलांनी मुलीच्याच फोनमध्ये व्हिडीओ काढले आणि त्या दिवसानंतर सतत हा व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवून तिच्यावर बलात्कार करायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर याबाबत कोणाकडेही वाच्यता केल्यास तुझ्या आईला घटस्फोट देईन अशी भीतीही दाखवली.
काही दिवसांनी मुलीची आई तिचा फोन पाहत असताना तिला फोटो गॅलरीमध्ये हे सर्व व्हिडीओ सापडले, याबाबत तिने मुलीकडे विचारणा केली असता पीडितेने काहीही सांगण्यास नकार दिला मात्र काही दिवसांनी तिने आपल्या वडिलांच्या कृत्याविषयी आईला सांगितले. तसेच जेव्हा आपण बॉयफ्रेंडसोबत सेक्स केला तेव्हा त्याने सुद्धा जबरदस्तीच आपल्याला असे करायला लावले असेही मुलीने सांगितले, हा प्रकार ऐकून मुलीच्या आईने पोलिसांकडे धाव घेत रीतसर तक्रार नोंदवली आहे.