धक्कादायक! नराधम पित्याचा पोटच्या मुलीवर 2 वर्षे बलात्कार; नकार दिल्यावर हत्या करून शरीराचे केले दोन तुकडे
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

समाज कितीही पुढारलेला असो, सरकारने कितीही कडक कायदे केले असोत तरी स्त्रियांवरील अत्याचार (Sexual Harassment) काही थांबत नाहीत. फक्त शारीरिक अत्याचारच नाही तर हे कृत्य लपवण्यासाठी अनेक स्त्रियांच्या जीवही घेतला जातो. पोटच्या मुलीवर बलात्कार (Rape) करून तिला ठार मारल्याप्रकरणी गोरखपूर (Gorakhpur) पोलिसांनी शनिवारी एका कलयुगी वडिलांना अटक केली. एसएसपी डॉ. सुनील कुमार गुप्ता (Sunil Gupta) यांनी याबाबत सांगितले की, मुलगी गायब असल्याची तक्रार आल्यानंतर चौकशी दरम्यान आरोपीने आपल्या 19 वर्षांच्या मुलीवर मागील दोन वर्षात अनेकदा बलात्कार करून तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

आरोपी वडील आपल्या मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार करीत होता. जेव्हा पीडितेने बलात्काराचा विरोध केला तेव्हा त्याने 26-27 जुलैच्या रात्री स्वत: च्या मुलीची हत्या केली. हे प्रकरण लपविण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेहाचे दोन तुकडे केला. डोके शेतात दफन केले गेले, तर धडाचे तुकडे करुन नाल्यात फेकण्यात आले. या मुलीची आई 15 वर्षापूर्वी वारली आहे. आपली बहिण गायब असल्याची तक्रार तिच्या मोठ्या बहिणीने केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. तपासामध्ये पोलिसांनी डोके व धड जप्त केले आहे. शेतातून सांगाडा म्हणून पीडितेचे डोके सापडले. पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल करून तुरूंगात रवानगी केली आहे. (हेही वाचा: पैसे संपले म्हणून बायकोवर लावला जुगाराचा डाव; हरल्यावर मित्रांनी केला सामूहिक बलात्कार; तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांचा नकार)

दरम्यान, महाराष्ट्रातील पंढरपूर येथे एका अल्पवयीन मुलीवर 5 जणांनी सामुहिक बलात्कार केला असल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. या घटनेने संपूर्ण पंढरपूर हादरून गेले होते. या मुलीला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक कली आहे. यातील एकजण या मुलीचा मित्र असल्याचे उघडकीस आले आहे.