मुंबई मध्ये जेट एअरवेजचे (Jet Airways) माजी सीईओ नरेश गोयल (Naresh Goyal) यांच्या घरी Enforcement Directorate ने छापा टाकला आहे. दरम्यान मनी लॉंड्रिंग प्रकरणामध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यात ईडीने केस दाखल केली आहे. दरम्यान बुधवार (4 मार्च) दिवशी सकाळी ईडी कडून नरेश गोयल यांना समन्स देखील पाठवण्यात आला आहे. दरम्यान छापा टाकण्यापूर्वी फेमा अंतर्गत दिल्ली आणि मुंबई मध्ये 12 ठिकाणी तपास केला आहे. यामध्ये जेट अधिकार्यांच्या अनेक ठिकाणांचा समावेश आहे. दरम्यान नरेश गोयल यांच्या 19 पैकी 5 कंपन्यांची नोंद परदेशामध्ये असून संशयास्पद पद्धतीने परदेशात आर्थिक व्यवहार करून पैशांचा गैरवापर केल्याची माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार, ईडीने परदेशी कंपन्यांसोबत केलेल्या व्यवहाराची कागदपत्र आणि डिजिटल स्वरूपातील पुरावे ताब्यात घेण्यात आले आहेत.
छापेमारीमध्ये एका ट्रॅव्हल कंपनीद्वारा करण्यात आलेल्या FIR मध्ये नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांच्यावर 46 कोटी रूपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप लावण्यात आले आहेत. नरेश गोयल यांची यापूर्वी देखील अशाच प्रकारे चौकशी करण्यात आली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात देखील ईडी कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली होती.
ANI Tweet
Mumbai: Enforcement Directorate (ED) raid is underway at the residence of former Chairman of Jet Airways, Naresh Goyal in connection with an alleged money laundering case. pic.twitter.com/0rFmo9B3Th
— ANI (@ANI) March 5, 2020
वर्षभरापूर्वी नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीला मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणार्या विमानात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. सोबतच दोघांविरूद्ध लूटआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. दरम्यान 8000 कोटी रूपयांचे कर्ज असलेल्या जेट एअरवेज विमान कंपनीला अनिश्चितकाळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रातोरात अनेक कर्मचारी रस्त्यावर आले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत जेट एअरवेज एअरलाईन ही सर्वाधिक हिस्सेदारी असलेली भारतातील दुसरी मोठी कंपनी होती.