मुंबईयेथील (Mumbai) जोगेश्वरी (Jogeshwari) परिसरात रुग्णावर बलात्कार (Rape Case) केल्याप्रकरणी मेघावाडी पोलिसांनी स्थानिक डॉक्टरला अटक केली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टराचे वाईट कृत्य लोकांसमोर आले. पीडित महिलेने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पीडित महिला मुळव्याधाचा उपचार घेण्यासाठी गेली असताना तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला, अशी माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वेळ न घालवता आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केले असता आरोपीला पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
वंशराज द्विवेदी असे 58 वर्षीय आरोपीचे नाव आहे. वंशराज जोगेश्वरी पूर्वेत स्वताचे क्लिनीक असून तो मुळव्याधग्रस्त रुग्णांवर उपचार करतो. पीडित महिलेचे लग्न झाले असून तिचे पालक जोगेश्वरी पूर्व येथे राहत आहेत. पीडित महिलेचे लग्न होण्यापूर्वी म्हणजे 2015 साली मुळव्याधावर उपचार घेण्यासाठी वंशराजच्या क्लिनीकमध्ये गेली होती. त्यावेळी वंशराज आणि पीडितेची ओळख झाली. 28 मे 2015 मध्ये उपचार दरम्यान डॉक्टरने पीडितला गुंगीचे इंजेक्शन दिले होते. त्यानंतर थेट 45 मिनिटानंतर पीडितला शुद्ध आली होती. पीडित उपचार घेवून घरी परतल्यानंतर तिच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ आला. या व्हिडिओत आपल्यावर अत्याचार झाल्याचे पीडितला समजले. तसेच शाररीक संबध ठेवण्यास नकार दिला तर, हा व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकीही वंशराजने पीडितला दिली. त्यानंतर वंशराजने पीडितला क्लिनीकवर बोलवून अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. हे देखील वाचा- मुंबई: वांद्रे येथे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक.
एएनआयचे ट्वीट-
Mumbai Police: Mumbai Police: A 58-year-old doctor arrested for allegedly raping, blackmailing, and circulating an objectionable video of a 27-year-old female patient. Case registered, further investigation underway. pic.twitter.com/kVpcYkOv58
— ANI (@ANI) October 14, 2019
2018 मध्ये पीडितचे लग्न झाले. त्यानंतर पीडितने वंशराज याच्याशी संपर्क तोडून टाकला. परंतु, 3 ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ पीडित महिलेच्या पतीने पाहिला. त्यांनतर पतीने पिडितकडे विचारपूस केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडिताने पतीसह मेघवाडी पोलिस ठाण्यात जाऊन हा धक्कादायक प्रकार सांगून वंशराज याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी वंशराज याला ताबडतोब अटक केली असून न्यायालयाने आरोपीला 17 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.