Railway Station ( Photo Credit -Wikimedia Commons)

मुंबईतील 20 रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार आहे. भारतीय रेल्वेच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील 1309 स्थानकांचे काम केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील 554 हून अधिक रेल्वेस्थानकामधील विविध विकासकामे तसेच 1500 रोड ओव्हर ब्रीज व भुयारी मार्गाचे 26 फेब्रुवारी उद्घाटन करणार आहेत. 4886 कोटींपेक्षा जास्त खर्च करून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. यातच मुंबईतील 20 रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 11 स्थानकांपैकी मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी जोगेश्‍वरी, मालाड आणि पालघर या 8 उपनगरीय स्थानकांची पायाभरणी करण्याकरिता 233 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.   (हेही वाचा - FM Travel in Mumbai Local Train: निर्मला सीतारामन यांनी मुंबई लोकल ट्रेनमधून केला प्रवास, प्रवाशांची साधला संवाद)

या 12 स्थानकांमध्ये सँडहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, वडाळा रोड, इगतपुरी या स्थानकांच्या समावेश आहे. या बारा स्थानकांमध्ये सर्वात जास्त निधी हा दिवा रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणी आणि पुनर्विकासासाठी देण्यात आला आहे. तर तब्बल 45 कोटी रुपये दिवा रेल्वे स्थानकाच्या कामासाठी देण्यात आले आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँड रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्वरी आणि मालाड स्थानकांवर बारा मीटर रुंद पायी ओव्हर ब्रिजसाठी तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी 85.23 कोटी इतका खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. याचा खर्चदेखील 233 कोटी रुपयांमध्ये समाविष्ट आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील 8 आणि मध्य रेल्वे मार्गावरील 12 असे मिळून मुंबईतील एकूण 20 स्थानकांच्या पुनर्विकास होणार आहे.