प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS) च्या डेटावरून असे दिसून आले आहे की, 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांचे एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर (Sex Partners) आहेत. या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा पुढे आहेत, पण पुरुषांचा आकडा संपूर्ण देशात खूप पुढे आहे. या सर्वेक्षणात आढळून आले आहे की, देशातील 4 टक्के पुरुष असे आहेत ज्यांचे अशा महिलांशी संबंध आहेत, ज्या त्यांच्या पत्नी नाहीत किंवा त्यांच्यासोबत राहत नाहीत. त्याच वेळी, अशा महिलांची संख्या केवळ 0.5 टक्के आहे.

हे सर्वेक्षण 1.1 लाख महिला आणि 1 लाख पुरुषांवर करण्यात आले. यावरून दिसून आले आहे की, अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांच्या सेक्स जोडीदारांची सरासरी संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. सर्वेक्षणानुसार, ज्या राज्यांमध्ये महिलांचे एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर आहेत त्यामध्ये राजस्थान, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, आसाम, केरळ, लक्षद्वीप, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. NFHS ने 2019-2021 दरम्यान हे सर्वेक्षण केले.

यामध्ये देशातील 707 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. हे सर्वेक्षण भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केले आहे. राजस्थानमध्ये एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर असलेल्या महिलांची संख्या सर्वाधिक आहे. अशा महिलांमध्ये सरासरी 3.1 टक्के सेक्स पार्टनर आहेत, तर एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर असलेल्या पुरुषांमध्ये हे प्रमाण सरासरी 1.8 टक्के आहे. NFHS च्या आकडेवारीनुसार, शहरी स्त्रियांचे सेक्स पार्टनर 1.5 टक्के असल्याचे आढळले, तर ग्रामीण महिला या बाबतीत पुढे असल्याचे दिसून आले. त्यांच्या आयुष्यात सरासरी 1.8 पेक्षा जास्त लैंगिक भागीदार होते. ग्रामीण भागात पुरुषांचे लैंगिक भागीदार जवळपास सारखेच असल्याचे आढळून आले. (हेही वाचा: Loud Sex: एखाद्या Pornstars प्रमाणे आवाज काढत सेक्स करत असे जोडपे; वैतागलेल्या शेजाऱ्यांनी दिला 'हा' सल्ला, घ्या जाणून)

सर्वेक्षणानुसार, दिल्लीतील महिलांमध्ये सरासरी 1.1 टक्के सेक्स पार्टनर आहेत. ही संख्या मध्य प्रदेशात 2.5 टक्के, उत्तर प्रदेशात 2.2 टक्के, तामिळनाडूमध्ये 2.4 टक्के, आसाममध्ये 2.1 टक्के आणि हरियाणामध्ये 1.8 टक्के आहे. हे सर्वेक्षण प्रामुख्याने उच्च-जोखमीचे संभोग आणि अशा संभोग दरम्यान कंडोम वापरण्याचे प्रमाण मोजण्यासाठी केले गेले.