MLA Abbas Ansari (फोटो सौजन्य - फेसबुक)

MLA Abbas Ansari Grants Interim Bail: सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे आमदार आणि दिवंगत मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) यांचे पुत्र अब्बास अन्सारी (Abbas Ansari) यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) यूपी गँगस्टर कायद्यांतर्गत एका प्रकरणात अटींसह अंतरिम जामीन (Interim Bail) मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की, अन्सारी यांना लखनौ येथील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी राहावे लागेल आणि त्यांच्या मतदारसंघात जाण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि ट्रायल कोर्टाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. यासंदर्भात निकाल देताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, अब्बास अन्सारी यांना गँगस्टर कायद्याशी संबंधित गुन्ह्यांचा अपवाद वगळता सर्व गुन्हेगारी प्रकरणांमध्ये जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अब्बास अन्सारी यांना पाळाव्या लागणार 'या' अटी -

या प्रकरणातील सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिले की, अब्बास अन्सारी ट्रायल कोर्टाच्या परवानगीशिवाय उत्तर प्रदेश सोडून जाऊ शकत नाहीत. न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या खटल्यांबाबत अन्सारी यांनी कोणतेही सार्वजनिक विधान करू नये. तथापि, न्यायालयाने स्पष्ट केले की, या प्रकरणांमध्ये अन्सारीचा स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे. (हेही वाचा - Mukhtar Ansari Death: मोठे षडयंत्र रचले जात होते, त्यांना तुरुंगात स्लो पॉयझन दिले जात होते' मुख्तार अन्सारीचा मुलगा उमरचा गंभीर आरोप)

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने असेही निर्देश दिले की, अब्बास अन्सारी यांनी जेव्हा गरज असेल तेव्हा ट्रायल कोर्टासमोर हजर राहावे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अब्बास अन्सारी हे उत्तर प्रदेशातील मऊ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ते तुरुंगात आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये बांदा तुरुंगात प्रकृती बिघडल्याने मुख्तार अन्सारी यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने मुख्तार अन्सारी यांच्यावर तुरुंगात विषबाधा झाल्याचा आरोप केला होता. (हेही वाचा -Mukhtar Ansari Death: मुख्तार अन्सारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; बांदा मेडिकल कॉलेजमध्ये घेतला अखेरचा श्वास- Reports)

तत्पूर्वी, 31 ऑगस्ट 2024 रोजी चित्रकूट जिल्ह्यातील कोतवाली कार्वी पोलिस ठाण्यात अन्सारी, नवनीत सचान, नियाज अन्सारी, फराज खान आणि शाहबाज आलम खान यांच्याविरुद्ध यूपी गुंड आणि समाजविरोधी घटना (प्रतिबंध) कायदा, 1986 च्या कलम 2, 3 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर खंडणी आणि मारहाणीचा आरोप होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर, 6 सप्टेंबर 2024 रोजी अब्बास अन्सारी यांना अटक करण्यात आली होती.