सुप्रसिध्द भारतीय उद्योजक मुकेश अंबानी आज तब्बल ३०० किलो सोनं दान करणार असल्याची बातमी सकाळपासूनचं चर्चेत आहे. तरी या तीन किलो सोन दान करण्यामागे नेमक कारण काय तर अंबानी आजोबांचे लाडके नातवंड आज भारतात परतले आहेत. तरी या आनंदात मुकेश अंबानी यांच्या अटेलिया बंगल्यात तसेच श्वेता आणि आनंद पिरामल यांच्या वरळीतील निवास्थानी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानी हिने १९ नोव्हेंबर रोजी जुळ्या बाळांना जन्म दिला होता. तर जन्माच्या एक महिन्यानंतर आज ईशा अंबानी तिच्या दोन्ही बाळांसाह पहिल्यांदाचं भारतात परतली आहे. बाळाच्या आगमनानंतर अंबानींच्या घरी आज देशातील विद्वान पंडीत येणार असुन महापुजा पार पडणार आहे. ‘करुणा सिंधू’ या निवासस्थानी धार्मिक सोहळा पार पडणार आहे. अंबानी या निमित्ताने ३०० किलो सोनं दान करणार आहेत. तसेच या पुजेचा प्रसाद बनवण्यासाठी देशातील सर्वोत्तम स्वयपाक्यांना आज अंबानींच्या निवासस्थानी बोलविण्यात आलं आहे.
ईशा अंबानी ही लॉस ऐजिंलीसवरुन परतली असुन लहान मुलांच्या आरोग्यासंदर्भातील तज्ज्ञ असलेल्या अमेरिकेतील सर्वोत्तम डॉक्टर्सपैकी एक असलेले डॉक्टर गिबसनही ईशा अंबानी सोबत आल्या आहेच. अंबानींच्या या जुळ्या नातवंडांना अमेरिकेमधून विशेष प्रशिक्षण घेऊन आलेल्या नर्सेस संभाळणार आहेत. इशा आणि त्यांच्या जुळ्या मुलांना भारतात परतण्यासाठी कतारच्या राजाने विशेष विमान पाठवलं आहे. (हे ही वाचा:- Mukesh Ambani Advice To Youth: 5G पेक्षाही माताजी पिताजी अधिक महत्वाचे, टेलिकॉम किंग मुकेश अंबानींचा देशातील युवा पिढीला मोलाचा सल्ला)
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
मायदेशी परतल्या असल्याने अंबानी कुटुंबियांनी लेकीच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली आहे. अंबानी आणि परिमल यांची घरांना रोषणाई करण्यात आली आहे. ‘करुणा सिंधू’ आणि ‘अँटेलिया’ची सजावट करण्यात आली आहे. तरी अंबानींच्या घरी असणाऱ्या या कार्यक्रमामुळे वरळी, महालक्ष्मी या परिसरात आज मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.