मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) धारमध्ये (Dhar) एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून (Indore) जळगावच्या (Jalgaon) दिशेने जाणारी बस नर्मदा नदीत (Narmada River) कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण बेपत्ता आहेत.या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे. अपघाताचे नेमेके कारण अद्यापही पुढे आले नाही. मदत आणि बचाव कार्यास सुरुवात झाली आहे. अपघात ग्रस्त ही बस महाराष्ट्र सरकार म्हणजे एस टी महामंडळाची असुन मुंबई आग्रा या मार्गावर ही दुर्घटना घडली आहे.
अपघातात (Accident) मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख (10 Lakh) रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी अपघाताच्या घटनेवर दु:ख व्यक्त करत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच या अपघातात जखमी झालेल्यांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदतीचा हात म्हणून मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री शिवराज चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी केली. (हे ही वाचा:-MSRTC Bus Accident Indore: इंदोर बस अपघातात मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एस टी महामंडळाला निर्देश)
An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives due to the bus tragedy in Dhar, Madhya Pradesh. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 18, 2022
आज खलघाट में हुई भीषण बस दुर्घटना में शोकाकुल परिजनों के साथ मैं और पूरी सरकार साथ खड़ी है।
मृतकों के परिवारजनों को मध्यप्रदेश शासन की ओर से 4-4 लाख रुपए की राहत राशि प्रदान की जायेगी।
शोकाकुल परिवार स्वयं को अकेला न समझे, दु:ख की इस घड़ी में हम सब साथ हैं।
।। ॐ शांति ।। pic.twitter.com/ZkZehWSqh2
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 18, 2022
महाराष्ट्र सरकार (Maharashtra Governement) म्हणजेचं एस टी महामंडळची (S T Mahamandal) बस होती. इंदोरमधून (Indore) या बसमध्ये 12 प्रवासी चढले. सकाळी 7 च्या सुमारास इंदोरवरुन जळगावच्या दिशेने निघाली. आग्रा-मुंबई (Agra Mumbai) हा महामार्ग इंदूरहून महाराष्ट्राला जोडतो. या महामार्गावर हा अपघात झाला असुन इंदूरपासून अपघाताचे घटनास्थळ 80 किलोमीटर अंतरावर आहे. अचानक नर्मदा नदीवरील ब्रिजवरुन बस खाली कोसळली. ज्या पूलावरुन ही बस कोसळली तो संजय सेतू पूल (Sanjay Setu Bridge) धार (Dhar) आणि खरगोन (Khargone) या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेला आहे. पुलाचा अर्धा भाग खलघाट (धार) मध्ये आणि अर्धा भाग खलटाका (खरगोन) मध्ये आहे.