Monsoon (Photo Credit: PTI/Representational Image)

Monsoon 2019 Predictions: उन्हाचा तडाखा सहन करत असलेले सर्वचजण आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरत आज मान्सूनचे अंदमानात आगमन झाले आहे. 18 ते 19 मे रोजीपर्यंत मान्सून हा अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता.

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला होता. स्कायमेटच्या माहितीनुसार, 4 जून दिवशी भारतामध्ये मान्सून होणार असा अंदाज होता. तसंच यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी पडेल, असे सांगण्यात आले होते. (6 जूनला मान्सून केरळ मध्ये दाखल होण्याची शक्यता; विदर्भ, मराठवाडा सह मध्य भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पडणार पाऊस)

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून अंदमानात दाखल होतो. यंदा मात्र मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे. अंदमानानंतर काही दिवसात मान्सून केरळात दाखल होईल. केरळानंतर पुढच्या 6-7 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात हजेरी लावेल.