प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

मोदी सरकारने देशात नोटबंदी सारखा महत्वपूर्ण निर्णय घेत काळ्या पैशांवर चांगलाच चाप बसलेला दिसून आला. त्यानंतर आता पुन्ही सरकार नोटबंदी सारख्याच एका मोठ्या निर्णयाची घोषणा लवकरच करणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इनकम टॅक्सच्या एमनेस्टी स्कीम अंतर्गत सोन्यासाठी एमनेस्टी स्किम (Amnesty Scheme) येण्याची शक्यता आहे. एका विशिष्ट मर्यादेच्या वरील पावतीशिवाय ठेवण्यात आलेल्या सोन्याची किंमतीसह संपूर्ण माहिती सरकारला द्यावी लागणार आहे.

एमनेस्टी स्किम अंतर्गत सोन्याचे मूल्यभाव ठरवण्यासाठी वॅल्यूऐशन सेंटरमधून प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. ही स्किम एका खास सीमेपर्यंत लागू असणार आहे. मात्र मर्यादेपेक्षा अधिक सोने आढळून आल्यास त्यावर जबरदस्त दंड द्यावा लागणार आहे. मंदिर आणि ट्रस्ट यांच्याकडे असणाऱ्या सोन्याची प्रोडक्टिव्ह इन्वेस्टमेंट अंतर्गत वापर करण्यासाठी एक खास नियम येणार आहे.अॅमनेस्टी स्किमसोबत सोन्याला Asset Class अंतर्गत चालना देण्यासाठी सुद्धा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी सोवरन गोल्ज बॉन्ड स्किमला आकर्षित करण्यासाठी महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत. सोवरन गोल्ड बॉन्ड सर्टिफिकेटला तारण ठेवण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध होणार आहे. (Diwali 2019: देशात मुहूर्ताच्या अवघ्या अर्ध्या तासात तब्बल 100 किलो सोने आणि 600 किलो चांदीची विक्री)

अर्थमंत्रालयाच्या आर्थिक विभाग आणि राजस्व विभागाने मिळून या स्किमचा मसूदा तयार केला आहे. अर्थ मंत्रालयाने हा प्रस्ताव कॅबिनेट यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे लवकरच या प्रस्तावाला मंजूरी मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रस्तावासंदर्भात चर्चा होणार होती. मात्र हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक असल्याने याबाबत निर्णय घेता आला नाही.