Mission Shakti: भारताने अंतराळातही केलं 'सर्जिकल स्ट्राईक', 3 मिनिटामध्ये पाडलं सॅटलाईट:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली माहिती
Narendra Modi (Photo Credits: ANI)

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार मोदींनी भारत अंतरिक्ष महाशक्ती बनला असल्याची घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. भारताने अंतराळात 300 किलोमीटर लांब असलेले अँटी सॅटेलाईट मिसाईलद्वारे (Anti-Satellite Missile) पाडले.  देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे मिशन महत्त्वाची आहे. याद्वारा दुश्मन राष्ट्राचं मिसाईल, रडार यांच्यावर देखरेख करता येणार आहेत.

नरेंद्र मोदींनी घोषणा करण्यापूर्वी कॅबिनेटची मिटिंग झाली.  यामध्ये परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री यांचा समावेश होता.  दिल्लीत सुरक्षा समितीची बैठक झाली. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे.

ANI ट्विट 

 

नरेंद्र मोदी ट्विट

11 एप्रिल ते 19 मेच्या दरम्यान देशात लोकसभा निवडणूका होणार आहेत. 23 मे दिवशी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे. नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून लढणार आहेत.