Mission 2024: प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर शरद पवार यांची आज विरोधी पक्षातील नेत्यांसोबत महत्वपूर्ण बैठक
Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mission 2024:  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची आज विरोधी पक्षातील नेत्यांसोबत महत्वूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉफ्रेंस आणि एनसीपी व्यतिरिक्त काही पक्षांची नेतेमंडळी उपस्थितीत राहणर आहेत. या बैठकीत शरद पवार यांच्याद्वारे सर्व विरोधी पक्षांना एकजूट करण्याचा दिशेने खुप महत्वपूर्ण मानले जात आहे. निवडणूकीचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांची सोमवारी शरद पवार यांच्यासोबत भेट झाली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. या दोघांची या महिन्यातील ही दुसरी भेट आहे.

महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी असे म्हटले की, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी होणाऱ्या बैठकीला फारुक अब्दुल्ला, यशवंत सिन्हा, पवन वर्मा, संजय सिंह, डी राजा, न्यायाधीश एपी सिंह, जावेद अख्तर, केटीएस तुलसी, करण थापर आशुतोष, वकील मजीद मेमन, खासदार वंदना चव्हाण, माजी निवडणूक आयुक्त एसवाय कुरैशी, केसी सिंह, संजय झा, सुधींद्र कुलकर्णी, कॉलिन गोंलाल्वेस, अर्थशास्री अरुण कुमार, घनश्याम तिवारी आणि प्रतिश नंदी यांच्यासह काही प्रमुख राजकीय नेते आणि प्रतिष्ठीत लोकांची उपस्थितीत असणार आहे. नवाब मलिक यांनी पुढे असे म्हटले की, या बैठकीत आगामी लोकसभा सत्र आणि देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.(Sharad Pawar Important Meeting in New Delhi: शरद पवार यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक; तिसऱ्या आघाडीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा)

दरम्यान, रजकिय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सोमवारी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या महिन्याच्या सुरुवातीला प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर आता ही दुसऱ्यांदा भेट झाली होती. विरोधी पक्षासोबत बैठक करण्यापूर्वी शरद पवार दिल्लीत एनसीपीच्या राष्ट्रीय कार्यसमिती सोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत विविध अजेंडावर चर्चा केली जाणार आहे.