Indian Railways: 14 एप्रिल 2020 रोजी किंवा त्यापूर्वी बुक केलेली सर्व रेल्वे तिकिटे होणार रद्द; प्रवाशांना मिळणार Full Refund
Indian Railways. (Photo Credits: PTI)

भारतीय रेल्वेने (Indian Railway) एक मोठा निर्णय घेत, 14 एप्रिल 2020 रोजी किंवा त्यापूर्वी बुक केलेली सर्व नियमित रेल्वे तिकिटे रद्द (Cancel) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबदल्यात रेल्वे प्रवाशांना संपूर्ण परतावा (Full Refund) देणार आहे. याचा अर्थ असा की आपण 14 एप्रिल 2020 रोजी किंवा त्याच्या आधी आगामी 120 दिवसांच्या रेल्वेची तिकिटे बुक केली असतील, तर आता अशा ट्रेन रद्द केल्या गेल्या आहेत. आयआरसीटीसीच्या म्हणण्यानुसार, सिस्टममध्ये रेल्वे रद्द झाल्यानंतर भारतीय रेल्वेकडून ऑटोमॅटीक पूर्ण परतावा देणे सुरू केला जाईल.

जूनमध्ये जेव्हा रेल्वे प्रवासासाठी बुकिंग करण्यास परवानगी देत ​​होती, तेव्हा लॉकडाऊन कालावधीत ही सर्व तिकिटे बुक करण्यात आली आहेत. दरम्यान, भारतीय रेल्वे तत्काळ प्रवासासाठी नियुक्त केलेल्या मार्गांवर आयआरसीटीसीच्या 230 विशेष गाड्या चालवत राहील. कोरोना विषाणूच्या  प्रसाराचा विचार करता, भारतीय रेल्वेने 15 एप्रिलपासून नियमित रेल्वे सेवांसाठी आगाऊ आरक्षण स्थगित केले. देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर 25 मार्चपासून राष्ट्रीय वाहतूक करणाऱ्या सर्व नियमित रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: पतंजलिचे कोरोना औषध 'Coronil' विषयी आयुष मंत्रालयाने मागवली माहिती; औषधाच्या प्रसिद्धीवर, जाहिरातीवर घातली बंदी)

लॉक डाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी रेल्वेने 12 मे रोजी, आयआरसीटीसी स्पेशल ट्रेन सेवा सुरू केली. सुरुवातीला आयआरसीटीसीच्या विशेष गाड्यांमध्ये 30 राजधानी शैलीतील वातानुकूलित गाड्यांचा समावेश होता. त्यानंतर, 1 जूनपासून 200-आयआरसीटीसी स्पेशल गाड्यांसह नॉन-एसी स्लीपर ट्रेन सेवा सुरू करण्यात आल्या. दरम्यान, जर का ट्रेन रद्द झाली नाही, परंतु प्रवाश्याला प्रवास करायचा नसेल, तर कोरोना विषाणूचा साथीचा धोका लक्षात घेता भारतीय रेल्वे आरक्षित तिकिटांची संपूर्ण रक्कम परत करेल. हा नियम पीआरएस काउंटरवर जनरेट तिकिटे आणि ई-तिकिट या दोन्हीसाठी लागू असेल.