NEET, JEE Exam 2020 संदर्भात महाराष्ट्रासह 6 राज्यांच्या मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली Review Petition
Supreme Court | (File Image)

महाराष्ट्र (Maharashtra), छत्तीसगढ (Chhattisgarh), राजस्थान (Rajasthan), पंजाब (Punjab), झारखंड (Jharkhand) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) या 6 राज्यातील मंत्र्यांनी जेईई आणि  नीट (JEE & NEET Exam) परीक्षांसंदर्भातील निर्णयावर रिव्ह्यु पीटीशन (Review Petition) दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) 17 ऑगस्ट रोजी दिलेल्या निर्णयाचा पुर्नविचार करावा आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलाव्या, असे या याचिकेत म्हटले आहे. दरम्यान जेईई परीक्षा 1-6 सप्टेंबर आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे.

यंदा दोन्ही परीक्षांसाठी देशातून सुमारे 27 लाख विद्यार्थी बसले आहेत. कोरोना व्हायरस संकटामुळे एप्रिल पासून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सप्टेंबरमध्ये या परीक्षा होणार असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून सातत्याने होत आहे. त्यात काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांनी या  मागणीसाठी जोर धरला आहे. (विद्यार्थ्याचा रडतानाचा व्हिडिओ पाहून सोनू सूद भावूक; 3 राज्यातील गरजू विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहण्याचे आश्वासन)

ANI Tweet:

विद्यार्थी, पालकांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी वारंवार होत असून देखील एनटीए (NTA) जेईई आणि नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून जेईई, नीट परीक्षा आवश्यक असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे म्हणणे आहे.