![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/08/File-image-of-curfew-in-Jammu-and-Kashmir-784x441-380x214.jpg)
तब्बल एक आठवड्यानंतर जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) प्राथमिक शाळा पुन्हा सुरु झाल्यानंतर, आता राज्य प्रशासनाने मंगळवारी माध्यमिक शाळादेखील (Middle Schools) पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारे जम्मू काश्मीरमधील वातावरण ढवळून निघाले आहे, ते पाहता या शाळांमध्ये केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांचीही उपस्थिती कमी राहिली आहे. कलम 370 रद्द झाल्यानंतर प्रथमच माध्यमिक शाळांसाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. बुधवारी एका दिवसाची विश्रांती घेऊन जम्मू-काश्मीरमध्ये नव्याने गठित केंद्र शासित प्रशासन कार्यरत झाले आहे.
श्रीनगरच्या कित्येक परिसरांसह काश्मीरमधील अनेक भागांवरील निर्बंध हटविण्यात आले. अहवालानुसार काही प्रदेशांमध्ये विशेषत: शहरातील डाउनटाउन भागातील हे निर्बंध अजूनही कायम आहेत. अधिकाऱ्यांनी असा दावा आहे की, श्रीनगरच्या अपटाऊन आणि सिव्हिल लाइन भागातून बॅरिकेट्स काढण्यात आले आहेत. यानंतर, प्राथमिक शाळा सुरु झाले त्याला योग्य प्रतिसाद मिळाल्यानंतर, सरकारने माध्यमिक शाळा सुरु केल्या. तथापि, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. (हेही वाचा: जम्मू-कश्मीर मध्ये आजपासून फोन आणि इंटरनेट सेवा सुरु)
सरकारच्या माध्यमिक शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल अधिक माहिती देताना सेहिरिश असगर म्हणाले, 'ज्या ठिकाणी प्राथमिक शाळांचे वर्ग सुरू झाले त्याच भागात मंगळवारी माध्यमिक शाळादेखील सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी शिक्षकांची अनुपस्थितीत ही 60 ते 80 टक्के कमी राहिली आहे. काही ठिकाणी ती 50 टक्के आहे.' आतापर्यंत एकूण 774 माध्यमिक शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.