Michael Patra यांची 'रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया' च्या Deputy Governor पदी नियुक्ती!
आरबीआय (Photo Credits: PTI)

विरल आचार्य नंतर आता मायकेल पात्रा (Michael Patra)हे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर (RBI Deputy Governor) म्हणून नियुक्त झाले आहेत. आयआयटी मुंबई (IIT Bombay) मधून अर्थशास्त्रामध्ये पीएचडी घेणार्‍या मायकल पात्रा यांनी 2005 साली आरबीआयच्या पधोतरण विभागामध्ये काम पाहण्यास सुरूवात झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर वित्त, पैसा याविषयी आर्थिक विश्लेषण आणि धोरण विभागाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. 1985 मध्ये ते आरबीआयमध्ये काम करण्यासाठी रूजू झाले. मायकल पात्रा हे हावर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकले आहेत.

ऑगस्ट 2019 मध्ये विरल आचार्य यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आता मायकल पात्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या एनएस विश्वनाथन, बीपी कनुनगो आणि एम के जैन हे डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम पाहत आहेत तर शक्तिकांत दास हे गव्हर्नर आहेत.

दरम्यान मायकल पात्रा यांचा कार्यकाळ पुढील 3 वर्षांसाठी असेल. त्यांना डेप्युटी गव्हर्नर सोबतच ते आता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचे सदस्य म्हणून कायम राहणार आहेत. दरम्यान मायकल पात्रा यांना आरबीआयमध्ये काम करण्याचा 35 वर्षांचा दांडगा अनुभव आहे.