Mehbooba Mufti On Article-370: मेहबुबा मुफ्ती यांचा मोठा निर्धार, जम्मू आणि कश्मीरमध्ये कलम 370 पुनर्स्थापीत होईपर्यंत निवडणूक लढवणार नाही
Mehbooba Mufti | (Photo Credits: ANI)

Mehbooba Mufti's Big Determination: जम्मू आणि कश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) हटविण्यात आलेले कलम 370 (Article 370) पुनर्स्थापीत होत नाही तोवर आपण निवडणूकच लढवणार नसल्याचा निर्धार पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केला आहे. त्या बंगळुरु येथे रविवारी (21 मे) बोलत होत्या. महबूबा मुफ्ती यांनी भाजपवर तीव्र शब्दांमध्ये हल्ला करत म्हटले की, जी-20 हा भारताचा कार्यक्रम आहे. परंतू, भाजप तो हायजॅक करत आहे. भाजपने बोधचिन्हाला कमळाने बदलले आहे. बोधचिन्ह देशाशी संबंधीत असायला हवे होते. हे SAARC आहे. जो आपल्या देशाला सादर करते. ज्याच्या माध्यमातून देशाच्या समस्यांवर तोडगा निघायला हवा.

मेहबुबा मुफ्ती यांनी पुढे म्हटले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत परिवर्तन पाहायला मिळाले. आयडिया ऑफ इंडिया वाचविण्यासाठी इतर पक्षांच्या तुलनेत सर्वात मोठी जबाबदारी काँग्रेसकडे आहे. या सर्वात कर्नाटकच्या जनतेचे विशेष कौतुक आहे. जेव्हा सर्वांनीच हार मानल्याची स्थिती होती. तेव्हा कर्नाटकने संपूर्ण देशाला नवा दृष्टीकोन दिला. आशेचा किरण दाखवला. (हेही वाचा, Jammu and Kashmir: काय होतं जम्मू-कश्मीरमधलं कलम 370, जाणून घ्या सविस्तर)

ट्विट

ट्विट

मेहबूबा मुफ्ती सईद या पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्या जम्मू आणि कश्मीर राज्याच्या मुख्यमंत्रीही राहिल्या आहेत. वडील वडील मुफ्ती महंमद सईद ह्यांच्या मृत्यूनंतर एप्रिल 2016 मध्ये मेहबूबा मुफ्ती सत्तेवर आल्या. जम्मू कश्मीर राज्याच्या त्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री होत्या.