Meesho च्या  Grocery Business पुनर्रचना निर्णयामुळे 150 कर्मचार्‍यांच्या कामावर गदा
Meesho App (Photo Credits: Wikimedia Commons)

Meesho या E-commerce firm मधून 150 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. Farmiso मधून आता Meesho Superstore असं त्यांनी नव्या रूपात ब्रॅडिंग केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कंपनी कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, grocery vertical ला आता अ‍ॅप मध्येच समाविष्ट करून घेतलं जाणार आहे.

ET सोबत बोलताना दिलेल्या माहितीनुसार Meesho च्या प्रवक्त्यांनी या रिस्ट्रक्चरच्या प्रक्रियेमुळे सुमारे 150 फूल टाईम कर्माचार्‍यांवर गदा येणार असल्याचं सांगण्यात आले आहे. तर या प्रभावित झालेल्या कर्मचार्‍यांना severance packages आणि outplacement assistance दिला जात आहे. ज्यामुळे त्यांना नवी नोकरी शोधण्यात मदत होणार आहे. 400 जण मिशो मध्ये प्रभावित झाल्याची चर्चा होती पण कंपनीने अधिकृतरित्या केवळ 150 जण प्रभावित झाल्याचं म्हटलं आहे.

कंपनीने 6 एप्रिल रोजी सांगितले की, सध्या सहा शहरांमध्ये उपलब्ध असलेली किराणा सेवा वर्षाच्या अखेरीस 12 शहरांपर्यंत वाढवली जाणार आहे. हे देखील नक्की वाचा: Unemployment and Bankruptcy Suicides: 2018 ते 2020 या काळात कर्जबाजारीपणामुळे 16,000 हून अधिक, तर बेरोजगारी मुळे 9140 लोकांनी केल्या आत्महत्या.

मिशोमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुपरस्टोअरमध्ये 500 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपनीत सर्वाधिक कर्मचारी आहेत. शहर पातळीवरील व्यवस्थापक, उत्पादन, डिझाइन आणि त्याच्या युजर इंटरफेसवर काम करणारे अधिकारी यांच्या भूमिका प्रभावित झाल्या आहेत.