Hospital | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

गुडगाव येथील मेदांता हॉस्पिटल (Medanta Hospital) मध्ये एका एअर हॉस्टेस ने आपण व्हेंटिलेटर वर असताना लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप केले आहेत.या प्रकरणी आता हॉस्पिटल कडून अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे. हॉस्पिटल कडून सध्या तपासामध्ये पूर्ण सहकार्य केले जाणार असल्याचं त्यांनी नमूद केले आहे. हॉस्पिटलच्या निवेदनावर Dr. Sanjay Durani यांची स्वाक्षरी आहे.

"आम्हाला एका रुग्णाच्या तक्रारीची माहिती मिळाली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. या टप्प्यावर, कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत आणि संबंधित सर्व कागदपत्रे, ज्यामध्ये त्या कालावधीतील रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजचा समावेश आहे ते पोलिसांना देण्यात आले आहे." असे हॉस्पिटलने सांगितले आहे.

तपासामधील ताज्या माहितीनुसार, रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन, पीडित महिला आणि तिचा पती माध्यमांशी बोलणे टाळत आहेत. गुरुग्राम पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीची ओळख पटविण्यासाठी रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

6 एप्रिल रोजी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) व्हेंटिलेटर सपोर्टवर असताना 46 वर्षीय एअर होस्टेसने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. डिस्चार्ज दिल्यानंतर तिने आपल्या पतीला याची माहिती दिली. Varanasi Shocker: वाराणसी मध्ये 7 दिवसांत 23 जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा 19 वर्षीय मुलीचा दावा; 6 जण अटकेत .

महिलेने तक्रारी मध्ये काय म्हटलं?

मेदांता हॉस्पिटल मधील ही धक्कादायक घटना 13 एप्रिलला समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. एअर होस्टेसने तिच्या तक्रारीत आरोप केला आहे की, उपचारादरम्यान, 6 एप्रिल दिवशी ती व्हेंटिलेटरवर होती, तेव्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ती व्हेंटिलेटरवर असल्याने काही बोलू शकत नव्हती आणि खूप घाबरली होती. पीडितेच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या वेळी ती बेशुद्ध होती आणि तिच्या आजूबाजूला दोन परिचारिका देखील होत्या.