MC Stan Indore Concert: बजरंग दलाकडून एमसी स्टॅनला मारहाण? लाईव्ह शो पाडला बंद
MC Stan Indore

बिग बॉस 16 चा विजेता रॅपर एमसी स्टॅनला इंदूरमधील लाइव्ह कॉन्सर्टच्या वेळी बजरंग दलाकडून मारहाण करत धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. लाइव्ह कॉन्सर्टच्या वेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शो मध्ये गोंधळ घालत हा शो बंद पाडल, स्टेजचा ताबा देखील घेतला. या सर्व प्रकारानंतर एमसी स्टॅनचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी या सर्व घटनेचा निषेध व्यक्त केला आणि एमसी स्टॅनच्या समर्थनात ट्विटरवर पब्लिक स्टँड्स विथ एमसी स्टॅन हा ट्रेंड सुरू झाला आहे.

इंदूरमध्ये 17 मार्चला एमसी स्टॅनच्या लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते त्याचवेळी बजरंग दलाने या कार्यक्रमाला विरोध केला होता. एमसी स्टॅन याच्या गाण्याच शिवीगाळ आणि महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवत असल्याता आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला होता. तसेच स्टॅन आपल्या गाण्यात ड्रग्जला प्रोत्साहन देतो असे देखील बजरंग दलाचे म्हणणे आहे.यासाठी त्यांनी लाइव्ह कॉन्सर्टच्या कार्यक्रमात शिरकाव करत गोंधळ घालून हा कार्यक्रम बंद पाडला.

दरम्यान या सर्व घटनेनंतर एससी स्टॅनच्या चाहत्यांनी त्याला सोशल मिडीयावर समर्थन दिले आहे. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले त्या स्टेजचा ताबा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचे दिसत आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ते स्टेजवर पोहचलेच कसे असा प्रश्न आता अनेकजण विचारत आहे. पोलिसांनी किंवा सुरक्षारक्षकांनी त्यांनाका रोखले नाही असा प्रश्न देखील विचारत आहे. तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते स्टॅनला मारण्याची धमकी स्टेजवरुन देत आहे, त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न देखील विचारला जात आहे.