Cars Catch Fire On Dwarka Expressway: दिल्लीच्या द्वारका एक्सप्रेस वे (Dwarka Expressway) वर रात्री उशिरा भीषण रस्ता अपघात (Accident) झाल्याची बातमी समोर आली आहे. द्वारका द्रुतगती मार्गावर बुधवारी रात्री दोन कारच्या धडकेने आग (Fire) लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या पथकाने अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. मात्र आग इतकी भीषण होती की दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या.
या घटनेची माहिती देताना अग्निशमन अधिकारी म्हणाले की, या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर उर्वरित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अपघाताचे कारण अद्याप पूर्णपणे समजू शकलेले नाही. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. (हेही वाचा -Accident in Parshuram Ghat: मुंबई-गोवा हायवे वर परशुराम घाटात अपघात; 10 जण जखमी)
द्वारका द्रुतगती मार्गावर कारला आग, पहा व्हिडिओ -
VIDEO | #Delhi: One person was killed and several injured after two cars collided and caught fire on Dwarka Expressway in the early hours of Wednesday. More details awaited.
(Source: Third Party) pic.twitter.com/M9neEEoRxY
— Press Trust of India (@PTI_News) December 4, 2024
वजीरपूर उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा मृत्यू -
याआधी 1 डिसेंबर रोजी दिल्लीच्या वजीरपूर उड्डाणपुलावर झालेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. अधिका-यांनी सांगितले की, या घटनेत सहभागी असलेल्या वाहनाची ओळख पटली असली तरी दुचाकीस्वाराला धडक देऊन ते घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.