
Explosion in Chemical Factory at Telangana: तेलंगणाच्या (Telangana) संगारेड्डी जिल्ह्यातील एका केमिकल कारखान्यात सोमवारी मोठा स्फोट (Explosion in Chemical Factory) झाला. रिअॅक्टर स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर सुमारे एक डझन जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील पासमैलाराम फेज 1 परिसरातील एका केमिकल कारखान्यात सोमवारी झालेल्या स्फोटात डझनहून अधिक कामगार जखमी झाले. स्फोटाची माहिती मिळताच 11 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, स्फोटाचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. स्फोटात औद्योगिक शेड पूर्णपणे उडून गेले. स्फोट इतका जोरदार होता की काही कामगार हवेत उडून 100 मीटर अंतरावर पडले. यावेळी 100 कामगार ड्युटीवर होते. तथापी, ज्या केमिकल कारखान्यात स्फोट झाला, तिथे विविध प्रकारची रसायने तयार करण्याचे काम केले जाते. या स्फोटात मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. तथापि, जखमी आणि मृतांची नेमकी संख्या अद्याप उघड झालेली नाही. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की जखमी आणि मृतांची नेमकी संख्या बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतरच कळेल. (हेही वाचा - MT Yi Cheng 6 Fire: ओमानला जाणाऱ्या जहाजाला भीषण आग; भारतीय नौदलाने बचाव कार्यासाठी INS Tabar केले तैनात)
तेलंगणातील केमिकल फॅक्टरीत स्फोट -
VIDEO | Medak, Telangana: At least ten people dead after a fire broke out following a reactor explosion at Sigachi Chemical Industry in Pashamylaram.
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/TgfWczjtoM
— Press Trust of India (@PTI_News) June 30, 2025
कंपनीच्या वेबसाइटनुसार, सिगाची इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक औषध कंपनी आहे जी सक्रिय औषध घटक (एपीआय), इंटरमीडिएट्स, एक्सिपियंट्स, व्हिटॅमिन-मिनरल मिश्रणे आणि ऑपरेशन्स आणि मॅनेजमेंट (ओ अँड एम) सेवांसाठी काम करते. तेलंगणा अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'ही घटना सिगाची फार्मा कंपनी, पसमेलारम फेज 1 येथे घडली. अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सुमारे 15-20 लोक जखमी झाले आहेत.