Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 'मन की बात' च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार
PM Narendra Modi (Photo Credits: ANI/File)

Mann Ki Baat:  पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (28 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता आपला रेडिओ कार्यक्रम मन की बात च्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधणर आहेत. उद्याची 74 वी 'मन की बात' असणार असून सर्वांचे लक्ष आता मोदी यांच्या बोलण्याकडे लागले आहे. याआधीच्या मन की बात कार्यक्रमात मोदी यांनी प्रजासत्ताक दिनावेळी शेतकऱ्यांच्या रॅली वेळी झालेला हिंसा पाहून ज्या पद्धतीने तिरंग्याचा अपमान झाला त्याचे दु:ख मोदी यांनी व्यक्त केले होते.(Pariksha Pe Charcha 2021: यंदा पूर्णपणे ऑनलाईन होणार्‍या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमामध्ये innovateindia.mygov.in द्वारा कसे व्हाल सहभागी?)

मोदी यांनी कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात सुद्धा चर्चा केली होती. त्यांनी असे म्हटले होते की, यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाच्य विरोधातील लढाईला एक वर्ष पूर्ण झाले. अशातच आता कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे.(Electric Vehicles: सर्व सरकारी अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अनिवार्य करावा- मंत्री नितीन गडकरी)

Tweet:

तसेच मोदी यांनी सर्व जनतेला खासकरुन तरुणांना उद्देशून असे म्हटले की, त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य सेनानींच्या बद्दल लिहावे. त्याचसोब महिला पायलट यांचे सुद्धा मोदी यांनी कौतुक केले होते. तर या महिलांनी अमेरिकेतील सॅन फ्रँन्सिसको ते बंगळुरु पर्यंत नॉन स्टॉप फ्लाइटची कमान संभाळली होती. त्यांनी दहा हजार किमी पेक्षा अधिक प्रवास त्यांनी इतिहास रचला. त्यांच्या या कार्याला मोदी यांनी सलाम सुद्धा केला.