Pariksha Pe Charcha 2021 (Photo Credits: InnovateIndia)

भारतामध्ये यंदा शैक्षणिक वर्षावर कोरोनाचा प्रभाव पहायला मिळाला आहे. मागील वर्षभरापासून अनेक विद्यार्थी त्यांच्या शाळा, कॉलेज, वर्ग मित्र, शिक्षक यांच्यापासून दूर राहूनच अभ्यास करताना दिसले. यंदा ऑनलाईन शिक्षण झाल्याने अनेकांवर तणाव आहे. पण या परिस्थितीमध्येही अभ्यास करून, ताण न घेता परीक्षेला कसं सामोरं जायचं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात परीक्षा पे चर्चा संबोधित करणार आहेत. त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याशी ते संवाद साधणार आहेत.

दरम्यान 2018 साली पहिला 'परीक्षा पे चर्चा' चा कार्यक्रम झाला होता. यंदा या कार्यक्रमाचं चौथं वर्ष आहे. या वर्षीच्या कार्यक्रमाचं आयोजन हे संपूर्णपणे ऑनलाईन करण्यात आले आहे. 9वी ते 12 वीचे विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतील. यंदाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 14 मार्च पर्यंत विद्यार्थ्यांकडे संधी आहे. हे विद्यार्थी, पालक innovateindia.mygov.in वर रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत.

Dr. Ramesh Pokhriyal Nishank यांचे ट्वीट

दिल्ली मधून यंदा परीक्षा पे चर्चा हा सारा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जाणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन मधून 2 हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक निवडले जाणार आहे. यंदा हा कार्यक्रम जगभरातील विद्यार्थ्यांसाठी खुला असेल. आज केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी सर्व विद्यार्थ्यांनी हसत आणि कसलाही ताण न बाळगता परीक्षांना सामोरं जावं असं आवाहन केलं आहे.