पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (31 जानेवारी) सकाळी 11 वाजता रेडिओ प्रोग्रॅम 'मन की बात' (Mann Ki Baat) द्वारे देशवासियांशी संवाद साधतील. नववर्षातील हा पहिलाच कार्यक्रम असून देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या काळात होणार आहे. तसंच उद्या अर्थसंकल्प 2021 देखील सादर होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड-19 लसीकरण, पोलिओ लसीकरण या मुद्द्यांनाही हात घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर मोदी नेमके कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार, याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. (Union Budget 2021: बिटकॉईनसारख्या क्रिप्टोकरन्सीवर येणार बंदी; केंद्र सरकार डिजिटल करन्सी आणण्याच्या तयारीत)
'मन की बात' हा रेडिओ प्रोग्रॅम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर वर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लेटेस्ट घडामोडी, समस्या यासंदर्भात जनतेशी संवाद साधतात. आज मन की बात चा 73 वा एपिसोड आहे. हा एपिसोड तुम्ही आकाशवाणी, दूरदर्शन शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटर पेज, भाजपा ट्विटर, फेसबुक पेजवरही ऐकू शकता. नरेंद्र मोदी अॅपवरही याचे प्रसारण करण्यात येईल.
येथे ऐका!
याशिवाय खालील लिंक्सवरही तुम्ही मन की बात चा कार्यक्रम ऐकू शकता.
• http://facebook.com/BJP4India
• http://pscp.tv/BJP4India
• http://youtube.com/BJP4India
• http://bjplive.org
गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी वोकल फॉर लोकल चा नारा देत स्वदेशी उत्पादनावर भर देण्याचे आवाहन केले होते. तर यापूर्वीच्या मन की बात कार्यक्रमात कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून दिले होते. त्याचबरोबर नववर्ष संकल्पामध्ये देशासाठी देखील एक संकल्प करा असे आवाहन त्यांनी देशवासियांना केले होते.