
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (27 डिसेंबर) दिवशी वर्ष 2020 मधील अखेरचं 'मन की बात' करणार आहेत. दरा महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओ द्वारा मोदी जनतेला संबोधित करतात. लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांवर, प्रश्नांवर काही दिशादर्शक उत्तरं देतात. या 2020 मधील 8-9 महिने कोरोनाचा सामना करण्यामध्ये गेले आहेत. एकीकडे कोरोना वायरसमुक्तीसाठी लसीची वाट पाहणार्या भारतीयांना आता पुन्हा नव्या स्ट्रेनच्या वायरसच्या भीतीने ग्रासलं आहे. अद्याप भारतात युकेच्या नव्या म्युटेशन झालेल्या वायरसचा रूग्ण नाही पण तो येऊ नये म्हणून प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. अशामध्ये मोदी आज भारतीयांना काय आवाहन करणार? लसीबद्दल काय अपडेट्स देणार? तसेच 2021 च्या स्वागता दरम्यान कोणती खबरदारी घेणं आवश्यक आहे, शेतकरी आंंदोलन अशा महत्त्वाच्या गोष्टींवर ते भाष्य करण्याची शक्यता आहे. Farmer's Protest: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 27 डिसेंबरला असणारी 'मन की बात' संपेपर्यंत प्रत्येकाने थाळ्या वाजवाव्यात, शेतकरी संघटनेचे आवाहन.
भारतामध्ये सध्या कोरोना वायरसचं संकट आटोक्यात आल्याचं चित्र आहे. अद्याप एकाही लसीला देशात तातडीच्या वापरासाठी मंजुरी मिळालेली नाही. परंतू केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2021 मध्ये कोणत्याही टप्प्यात देशात लसीकरण सुरू केले जाऊ शकते. प्राधान्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात 30 कोटी भारतीयांना लस मिळू शकते. यामध्ये कोविड योद्धे, आरोग्य कर्मचारी आणि वयोवृद्ध लोकं यांचा समावेश आहे.
मन की बात लाईव्ह इथे ऐका
दरम्यान अमेरिका, युके, युएई, रशिया मध्ये कोविड 19 च्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे भारतीय देखील आता त्याच्या प्रतिक्षेत आहेत. देशात ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोना वायरस 70% अधिक वेगाने पसरू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आल्याने भारताने युके वरून येणार्या फ्लाईट्सना स्थगित केले आहे. सध्या ही बंदी 31 डिसेंबर पर्यंत आहे.