Mann Ki Baat: जलसंधारणासाठी केंद्र सरकार लॉन्च करणार 'Catch the Rain' अभियान- पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi | (Photo Credits: IANS)

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'मन की बात' (Mann Ki Baat) या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी जलसंधारण, राष्ट्रीय विज्ञान दिवस यावर भाष्य केले. त्याचबरोबर देशाच्या विविध भागातील व्यक्तींच्या प्रेरणादायी गोष्टीही जनतेसोबत शेअर केल्या. तसंच जलशक्ती मंत्रालयाकडून 'Catch the Rain' हे नवे अभियान सुरु करण्यात येणार असून जलसंधारणाबाबत नागरिकांनी अधिक जागरुक असणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

जलसंधारणाबाबत आपण आपली भूमिका आणि कर्तव्ये जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या महिन्याच्या 22 मार्च रोजी राष्ट्रीय जल दिवस साजरा केला जाणार आहे. दरम्यान, काही दिवसांत जलशक्ती मंत्रालयाकडून 'Catch the Rain' हे नवे अभियान सुरु करण्यात येणार आहे. 'Catch the Rain, where it falls, when it falls' असे अभियानाचे घोषवाक्य आहे.  जलसंधारण व्यवस्थापनेमुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात 112 विविध प्रजातीच्या पक्षांचे दर्शन घडते, असे मोदींनी सांगितले.

ANI Tweet:

ओडिसा मधील अरखुदा येथील सिलू नायक हे एका नवीन मिशनवर आहेत. सुरक्षा दलामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व तरुणांना हे मोफत प्रशिक्षण देतात. भारतातील सुरक्षा दलातील कित्येक जवानांना त्यांनी ट्रेनिंग दिले आहे.

आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही.रमण यांच्याही कार्याचे स्मरण केले.  रमण यांनी  'रमण इफेक्ट'चा शोध लावला. म्हणून त्यांच्या या शोधासाठी आजचा दिवस समर्पित करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यांचा इतिहास  तरुणांनी जरुर वाचावा, असे आवाहनही मोदींनी केले.