काँग्रेस नेत्या शीला दीक्षित म्हणाल्या, 'दहशतवाद विरोधात मनमोहन सिंह यांच्यापेक्षा मोदींनी कडक कारवाई केली'
शीला दीक्षित | File Pic | (Photo Credits: PTI)

दिल्ली प्रदेश काँग्रेस कमेटी अध्यक्षा शीला दीक्षित (Sheila Dikshit) दीक्षित यांनी मोदी सरकारचे गुरुवारी (14 मार्च 2019) कौतुक केले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्या पेक्षा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अधिक कड कारवाई केल्याचे उद्गार शिला दीक्षित यांनी काढले. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Mumbai Terror Attack) त्याचे प्रत्युत्तर म्हणून शिला दीक्षित यांनी पुलवामा हल्ल्याला दिलेल्या प्रत्युत्तराप्रमाणे प्रत्युत्तर दिले नाही. दरम्यान, शिला दीक्षित यांच्या वक्तव्याचे काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार पडसाद उमटण्यास सुरु झाली. त्यानंतर शिला दीक्षित यांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून ते चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्याचा आरोप केला.

शीला दीक्षित यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले की, मी प्रसारमाध्यमांवर पाहिले की, माझ्या मुलाखतीतील ठराविक भाग चुकिच्या पद्धतीने आणि अर्धवट रुपात चुकीचा अर्थ काढून दाखवला, वापरला जात आहे. मी म्हटलं होतं की, असे असू शकते की, काही लोकांना असे वाटते की, मोदी सरकार दहशतवादाविरुद्ध कडक पावले उचलत आहे. परंतू, हा केवळ निवडणूकीत वापरण्यासाठी काढलेला मुद्दा आहे. (हेही वाचा, तुमचं मत हेच तुमचं शस्त्र, योग्य मुद्द्यांवर विचारपूर्वक निर्णय घ्या: प्रियंका गांधी)

शीला दीक्षित यांच्या कथित वक्तव्यानंतर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शिला दीक्षित यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे की, शीला दीक्षित यांचे विधान आश्चर्यचकीत करणारे आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये काहीतर कारस्थान शिजत आहे.